धनगव्हाणमध्ये भक्तिरसात रामनवमी सोहळ्याची जय्यत तयारी! करंजूआई देवीच्या छबिना पालखी सोहळ्यास भक्तगणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

2 min read

अखंड हरिनाम सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव – ज्ञानयज्ञाची ५० वर्षांची परंपरा

Grand Preparations for Ram Navami Celebration in Dhangavhan! Devotees Enthusiastically Participate in Karanjuai Devi’s Chhabina Palkhi Procession!

Anil Ghare

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB

मावळ (प्रतिनिधी): पवनानगर ( मावळ ) रविवार दिनांक ०६ / ० ४ / २०२५ रोजी मावळ तालुक्यातील धनगव्हाण येथील मंदिरात चैत्र शु रामनवमी जन्मोत्सव निमित्त व करंजूआई देवीचा छबिना पालखी यात्रेची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे रामनवमीनिमित् हरीजागर प्रवचन कीर्तन तीन ते चार दिवस सलग अखंड हरिनाम सप्ताह महाआरती प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

अखंड हरिनाम सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव – महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकारांची मांदियाळी!
धनगव्हाण येथे ५० वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जात आहे. यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नामवंत प्रवचनकार व कीर्तनकारांची वाणी रसिक भाविकांना लाभणार आहे.

📅 प्रवचन व कीर्तन कार्यक्रम:
🔸 गुरुवार, ३ एप्रिल २०२५

  • सायं. ४-५: हभप महादेव महाराज घारे (येलघोल) – प्रवचन
  • रात्री ७-९: हभप ज्ञानेश्वर (माऊली) महाराज पाटील (रायगड) – कीर्तन

🔸 शुक्रवार, ४ एप्रिल २०२५

  • सायं. ४-५: हभप शंकर महाराज आडकर (शिवली) – प्रवचन
  • रात्री ७-९: हभप रामानंद महाराज शिंदे (आळंदी) – कीर्तन

🔸 शनिवार, ५ एप्रिल २०२५

  • सायं. ४-५: हभप सुनील महाराज वरघडे (आर्डव) – प्रवचन
  • रात्री ७-९: हभप संजय महाराज कावळे (आळंदी) – कीर्तन

🔸 रविवार, ६ एप्रिल २०२५ (रामनवमी सोहळा)

रात्री ११ – सकाळी ४: श्री तासुबाई कलापथक मंडळ मौजे कल्हाट यांचा भजनी भारूडाचा कार्यक्रम

पहाटे ६-७: श्री महापूजा व अभिषेक

सकाळी १०-१२: हभप आबा महाराज गोडसे (आळंदी) यांचे श्रीराम जन्मकाल्याचे कीर्तन

सायं. ४-६: करंजूआई देवीचा छबिना व पालखी मिरवणूक

सायं. ८-१०: ढोल-ताशा व लेझीम संस्कृतिक कार्यक्रम


वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय परंपरेचा गौरवशाली सुवर्ण सोहळा!

गेल्या ५० वर्षांपासून धनगव्हाण येथे अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. या कार्यक्रमामुळे गावामध्ये आध्यात्मिक आणि सामाजिक एकता वृद्धिंगत होत आहे. यंदा सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने अत्याधुनिक प्रकाशयोजना, मंडप, ध्वनीप्रकाश व्यवस्था यांची खास तयारी करण्यात आली आहे.

या उत्सवा निमित्त टाइम्स ऑफ पुणे च्या टीम ने गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मान्यवरांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे

“आमच्या वडिलोपार्जित परंपरेचा हा रिवाज आजही जपला जात आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. त्या सर्व पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना, अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सवी वर्षात पोहोचल्याचा आम्हाला आनंद आहे. हा सुवर्ण महोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी आम्ही सर्वांनी नियोजन केले आहे.”
— मा. श्री रंगनाथ घारे (माजी सरपंच)

“पिढ्यानपिढ्या आमच्या गावातील जाणत्या मंडळींनी अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरू ठेवली. पूर्वीच्या काळात गॅस बत्ती भाड्याने आणून उजेडाची व्यवस्था केली जात असे, आणि मंदिराच्या प्रांगणात कीर्तन उभे राहत असे. आज, विद्युत रोषणाई, लाईट, स्पीकर आणि मंडप यामुळे या सोहळ्यात मोठा बदल झाल्याचे पाहून आनंद आणि अभिमान वाटतो.”
मा. श्री अर्जुन घारे (प्रगतिशील शेतकरी)

“संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायांचा जिल्ह्यात आम्ही राहतो, याचा आम्हाला अभिमान आहे. ही आमची श्रद्धास्थाने आहेत, आणि पुढील पिढीपर्यंत त्यांचे विचार पोहोचवण्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यासारखा दुसरा प्रभावी मार्ग नाही.”
मा. श्री भरत घारे (मा. सरपंच)

“महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची समृद्ध आणि महान परंपरा लाभली आहे. गावकरी, तरुण मंडळ आणि महिलांच्या संयुक्त प्रयत्नांतून आम्ही सुवर्ण महोत्सवी वर्ष उत्साहात साजरे करत आहोत, याचा आम्हाला मोठा आनंद आहे. या सोहळ्यात संतवाणीचे निरूपण होईल, जे भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा देईल.”
मा. श्री सोपान घारे (मा. सरपंच)

“आमच्या पूर्वजांनी अखंड हरिनाम सप्ताहाचे छोटेसे रोप लावले, त्याचा अभिमान आम्हा सर्वांच्या मनात आहे. संत विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी हा धार्मिक उत्सव आनंदात साजरा होत आहे. संतांनी दिलेला समतेचा संदेश आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी असून, तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही आमची जबाबदारी आहे.”
मा. श्री लक्ष्मण घारे पाटील (मा. पोलीस पाटील)

“महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची समृद्ध आणि महान परंपरा लाभली आहे. पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या आमच्या वडीलधाऱ्यांनी हा पवित्र रिवाज जपला आहे, आणि तो आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.”
हभप मा. श्री गणपत घारे (वारकरी संप्रदाय)

“ग्रामदेवता ही सर्वांचीच श्रद्धेचे महान केंद्र आहे. त्याला जोडून अखंड हरिनाम सप्ताह हा भक्तीमय परंपरेचा अमूल्य योग आमच्या गावात गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांपासून सुरू आहे. याचा आम्हाला अपार अभिमान आहे. हा अभिमान केवळ आमच्या पिढीपुरता मर्यादित नाही, तर पुढील पिढ्याही ही परंपरा जपून या सोहळ्याची अधिक उंची वाढवतील.”
मा. श्री संतोष घारे (ग्रामपंचायत सदस्य)

“पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेनुसार यंदाही श्री प्रभू रामचंद्र जन्मोत्सव आणि करंजूआई देवीच्या छबिना पालखी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत टिकावी, यासाठी अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचा मार्ग आम्ही कायमस्वरूपी पुढे चालत राहू.”
मा. श्री सुभाष घारे (पोलीस पाटील)

“महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि प्रवचनकार या सोहळ्यात संत वचनांचे निरूपण करणार आहेत. सर्व ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नातून हा सुवर्ण महोत्सवी वर्ष सोहळा उत्साहात साजरा होत आहे, याचा आम्हाला अतिशय आनंद आहे.”
मा. श्री शरद घारे (मा. चेअरमन, शिवली विविध सोसायटी)

या वेळी गावातील युवकांनी देखील आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले कि, “वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या टिकून असलेल्या परंपरेचा उत्साह आजही तितकाच तेजस्वी आहे! श्री प्रभू रामचंद्र जन्मोत्सव आणि करंजूआई देवीच्या छबिना पालखी यात्रेच्या भव्य सोहळ्यात संपूर्ण गावकऱ्यांचा, महिला मंडळाचा आणि तरुण मंडळाचा उत्स्फूर्त सहभाग असतो. श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा हा दिव्य संगम पुढील पिढ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल!”
ज्ञानेश्वर घारे, गणेश घारे, जगन्नाथ घारे, हरीदास घारे, अनिल घारे, योगेश घारे, कैलास घारे, गुलाब घारे, उमेश घारे, विठ्ठल घारे, विनोद कदम, सचिन घारे, दत्ता येळवंडे, पोपट घारे, पांडुरंग घारे, नवनाथ घारे, नवनाथ कानगुडे, रमेश कदम, लहू घारे, अंकुश घारे, राहुल घारे.

Highlights:

Grand Preparations for Ram Navami Celebration in Dhangavhan!

Devotees Enthusiastically Participate in Karanjuai Devi’s Chhabina Palkhi Procession!

Golden Jubilee of Akhand Harinam Week – 50 Years of Spiritual Legacy

The village of Dhangavhan in Mawal Taluka is gearing up for a grand Ram Navami celebration on April 6, 2025. The event will feature religious activities such as Harijagar, continuous Harinam Week, spiritual discourses (Pravachan), Kirtan, Maha Aarti, and Mahaprasad. A highlight of the festival is the Karanjuai Devi Chhabina and Palkhi procession, attracting devotees from across Maharashtra.

This year marks the Golden Jubilee of the Akhand Harinam Week, a tradition upheld for 50 years. Renowned spiritual speakers and Kirtankars from Maharashtra will participate in Pravachan and Kirtan sessions from April 3 to April 6.

The festival will also feature a grand cultural celebration with Dhol-Lezim performances and a Bhajan-Bharud program by the Shri Tasubai Kalapathak Mandal. The local leaders and devotees express their deep pride in continuing this legacy of the Warkari Sampraday. The village is fully decked up with lighting, sound systems, and modern arrangements to enhance the spiritual experience.

The event aims to keep the age-old traditions alive for future generations while uniting the community in devotion and celebration.

  • Ram Navami Festival 2025
  • Dhangavhan Ram Navami Celebration
  • Karanjuai Devi Chhabina Palkhi Procession
  • Akhand Harinam Week Golden Jubilee
  • Spiritual Events in Maharashtra
  • Marathi Kirtan and Pravachan Festival
  • Sant Tradition and Warkari Sampraday

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours