सिंदूर ऑपरेशनसाठी माजी सैनिक सज्ज! देशासाठी पुन्हा शस्त्र हाती घेण्याची तयारी; केंद्र व राज्य सरकारकडे सेवा संधीची मागणी

2 min read

Veterans Ready for ‘Sindoor Operation’: Ex-Servicemen Offer Support for National Security, Seek Official Deployment Opportunity

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB


पुणे | देशाच्या सीमांवर वाढत्या आतंकवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेल्या “सिंदूर ऑपरेशन” या विशेष मोहिमेला यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रभरातील माजी सैनिक एकवटले आहेत.

“एकदा सैनिक, कायम सैनिक” या भावनेने प्रेरित होऊन, हे माजी सैनिक देशसेवेच्या दुसऱ्या पर्वासाठी सज्ज झाले असून, प्रत्यक्ष युद्ध किंवा सेकंड लाईन डिफेन्समध्ये सहभागी होण्यास तयार आहेत. हवाई हल्ला, आपत्ती व्यवस्थापन, मॉक ड्रील्स अशा प्रशिक्षणाचा अनुभव असलेल्या या जवानांनी केंद्र व राज्य सरकारकडे अधिकृत सेवा संधी मागितली आहे

भारत सरकारचे संरक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देऊन माजी सैनिक देशसेवे साठी पुन्हा सरसावले.

माजी सैनिकांच्या या प्रतिनिधी मंडळा मध्ये : दीपक राजे शिर्के – माजी सैनिक सेल, प्रदेशाध्यक्ष, श्रीमंत राठोड – उपाध्यक्ष,अमित मोहिते पाटील – सरचिटणीस,ॲड. राजेंद्र कदम – समन्वयक,कॅप्टन बाबू पोळके,सुबेदार मेजर भूवाल सिंग,सुबेदार संभाजी लांडगे,दत्तात्रय सुक्रे – खेड तालुका अध्यक्ष यांचा समावेश होता.

आकडेवारी आणि तथ्य

  • 2024 च्या उत्तर भारत सीमेवरील तणावानंतर सरकारने सिंदूर ऑपरेशन सुरू केल्याचे जाहीर केले.
  • याआधीही कारगिल युद्धात अनेक माजी सैनिकांनी गैरसेवा कालावधीतही मदत केली होती.
  • राज्यस्तरावर माजी सैनिकांच्या सेवा वापरण्याचा ठोस आराखडा आजतागायत अस्तित्वात नाही, हे वारंवार चर्चेत आले आहे.
  • भारतात सुमारे ३२ लाख माजी सैनिक असून त्यांचा अनुभव राष्ट्रीय सुरक्षेसाठी अमूल्य आहे.
  • सीमारेषेवरील संघर्षात प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज वाढतेय, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील १.२ लाखांहून अधिक माजी सैनिक विविध जिल्ह्यांतून सज्ज आहेत.
  • यातील बरेचसे सैनिक रिटायरमेंट नंतर ५५ वर्षांखालील वयाचे असून, फिजिकली फिट आहेत.


Veterans Ready for ‘Sindoor Operation’: Ex-Servicemen Offer Support for National Security, Seek Official Deployment Opportunity


In response to the increasing threat of terrorist attacks and the launch of India’s strategic “Sindoor Operation”, ex-servicemen across Maharashtra, including Pune district, have stepped forward offering their support either on the battlefield or in second-line defence roles. These trained veterans, with expertise in air strike response and mock drills, have formally submitted a memorandum via the Pune District Collector to the Defence Minister, Chief Minister of Maharashtra, and Deputy CM Ajit Pawar. Their primary demand is an official opportunity to serve the nation again. The representation included several state-level leaders from the veterans’ cell, highlighting the readiness of over 1.2 lakh ex-servicemen in Maharashtra alone. The move reignites the conversation around establishing a structured reserve force and leveraging veterans’ experience for national security.

  • Sindoor Operation ex-servicemen support
  • Indian veterans offer help in national operation
  • Ex-servicemen Pune submit memorandum
  • Second line defence India
  • Indian Army veterans readiness 2025
  • Maharashtra ex-army deployment demand
  • Sindoor Operation Maharashtra veterans
  • Veterans for national security India

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours