राष्ट्रवादीचा मास्टरस्ट्रोक : सुनील टिंगरे यांचे जोरदार कमबॅक – पूर्व पुण्याचा कारभार मा. आमदार सुनील टिंगरे यांच्याकडे तर पश्चिम सुभाष जगताप यांच्या कडे

2 min read

Masterstroke by NCP: Pune City Divided into East & West; Sunil Tingre and Subhash Jagtap Appointed as City Presidents

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB

पुणे, १ जून २०२५

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) रणनीतीत मोठा फेरबदल करत पुणे शहराचा राजकीय नकाशा दोन भागांमध्ये विभागण्यात आला आहे – पूर्व पुणे आणि पश्चिम पुणे. या दोन्ही भागांसाठी स्वतंत्र शहराध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली असून, या नव्या निर्णयाने पक्ष संघटन अधिक प्रभावी आणि क्षेत्रनिहाय गतिमान होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सुनील टिंगरे यांचे जोरदार कमबॅक – पूर्व पुण्याचा कारभार माजी आमदार सुनील टिंगरे यांच्याकडे

पूर्व पुणे – कसबा, कॅम्प, हडपसर आणि वडगाव शेरी या विधानसभांना समाविष्ट असलेला हा विभाग – येथील नेतृत्वाची जबाबदारी माजी आमदार सुनील टिंगरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्या सह रुपाली ठोंबरे पाटील आणि हाजी फिरोज शेख यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनील टिंगरे यांच्या कार्याची वेळोवेळी प्रशंसा केलीली पाहवयास मिळाली असून, पक्षासाठी विश्वासार्ह आणि काम करणारा चेहरा म्हणून टिंगरे यांचे पारडे जड पाहायला मिळाले,विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव स्वीकारल्या नंतर पक्ष संघटने मध्ये शहर पातळी वर महत्वपूर्ण जबादारी मिळाल्याने मा. आमदार सुनील टिंगरे यांचे जोरदार कमबॅक केल्याने त्यांचा कार्यकर्त्यां मध्ये चैतन्याचे वातावरण दिसून आले.

पश्चिम पुण्यात सुभाष जगताप यांचा पुनरागमन

पश्चिम पुणे – पर्वती, खडकवासला, कोथरूड आणि शिवाजीनगर या विधानसभा क्षेत्रांचा समावेश असलेल्या या विभागाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांना बनवण्यात आले आहे. त्यांच्या सोबत प्रदीप देशमुख यांची पुन्हा कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली असून अकुर कुदळे हे दुसरे कार्याध्यक्ष म्हणून समाविष्ट झाले आहेत.

शहर अध्यक्षांची घोषणा थेट अजित पवार यांच्या आदेशाने

या नियुक्त्यांची घोषणा पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देवून झाली. ही नावं आमदार चेतन तुपे यांनी औपचारिकरित्या जाहीर केली असून, या नेमणुका थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिफारशीनुसार करण्यात आल्या आहेत.

आकडेवारी

पूर्व पुणे: ४ विधानसभा क्षेत्रं, एकूण मतदार – सुमारे १७ लाख

पश्चिम पुणे: ४ विधानसभा क्षेत्रं, एकूण मतदार – सुमारे १६.५ लाख

एकूण PMC क्षेत्रातील नगरसेवकांची संख्या (मागील कार्यकाळ) – १६२



Masterstroke by NCP: Pune City Divided into East & West; Sunil Tingre and Subhash Jagtap Appointed as City Presidents

In a significant political restructuring, the NCP (Ajit Pawar faction) has bifurcated Pune city into two zones: East and West. Former MLA Sunil Tingre has been appointed as City President of East Pune, while Subhash Jagtap will lead West Pune. These appointments, declared by Chetan Tupe and formalized by Sunil Tatkare, were made under Deputy CM Ajit Pawar’s direct recommendation.
The reshuffle comes in the wake of previous city president Deepak Mankar’s resignation due to legal and corruption issues. Sunil Tingre’s appointment marks a confident return, owing to his performance as MLA from Vadgaon Sheri from 2019–2024. The party aims to revive its grassroots strength and prepare strategically for upcoming elections.

  • Sunil Tingre NCP City President East Pune
  • Subhash Jagtap NCP West Pune
  • NCP Pune city restructure 2025
  • Ajit Pawar political strategy Pune
  • Vadgaon Sheri MLA Sunil Tingre performance
  • Deepak Mankar resignation Pune NCP
  • NCP Pune new appointments 2025
  • Pune East West zone NCP leaders

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours