

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB
नवी दिल्ली (लाजपत भवन), 15 जून 2025 – अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या वतीने आयोजित ऐतिहासिक ‘योग महाकुंभ 2025’ मध्ये देशभरातील नामवंत योगगुरु, साधक आणि शिक्षकांनी रेकॉर्ड सहभाग केला. पुण्यातील विशाल संपूर्ण आरोग्य संस्था आणि त्यांच्या संस्थापक डॉ. विशाल गुरव यांचा देशपातळीवर विशेष ठसा उमटला.
आदियोगी योग भूषण पुरस्कार – योगाच्या सेवा-विश्वाला गौरव
डॉ. विशाल गुरव यांना ₹2,50,000 किमतीचे ‘आदियोगी योग भूषण पुरस्कार 2025’ देऊन त्यांच्या 15 वर्षांच्या योग शिक्षण आणि समाजप्रबोधन कार्याचा सत्कार करण्यात आला.
“योग म्हणजे फक्त आसन-प्राणायाम नाही; हा समाज परिवर्तनाचा स्त्रोत आहे. प्रत्येक परीने हे संस्कार पोहोचवणे हा आमचा ध्यास.” : डॉ. विशाल गुरव.
अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाच्या वतीने आयोजित ‘भव्य योग महाकुंभ 2025’ या ऐतिहासिक योग समारंभात देशभरातील नामवंत योगगुरु, साधक आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या महोत्सवात पुण्याच्या ‘विशाल संपूर्ण आरोग्य संस्था’ चा सहभाग विशेषतः लक्षणीय ठरला. संस्थेचे संस्थापक डॉ. विशाल गुरव यांना योग क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी ‘आदियोगी योग भूषण पुरस्कार 2025’ प्रदान करण्यात आला. सन्मान स्वीकारताना डॉ. गुरव म्हणाले, “योग ही केवळ शरीरशुद्धीची प्रक्रिया नाही, तर समाजप्रबोधनाचे शक्तिशाली माध्यम आहे.
अशा कार्यक्रमांद्वारे योग देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचतो आणि लोकजीवनात मुळं रोवतो.” संस्थेच्या अध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी गायकवाड यांनाही महिला सशक्तीकरण आणि सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या साधिकांनी सादर केलेल्या भावस्पर्शी ‘गणेश वंदना’ ने झाली. ज्योती भीमाशंकर गायकवाड, विजयालक्ष्मी गायकवाड आणि सुप्रिया कदम या साधिकांच्या सादरीकरणाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले.
या त्रयीला ₹२१,०००/- सन्मान निधी व विशेष गौरव प्रदान करण्यात आला. संस्थेचे विद्यार्थी नकुल बनसोडे, अनुष्का खैरे आणि आदिती सुतार यांनी देखील आपल्या प्रभावी योग सादरीकरणांमधून कार्यक्रमात विशेष ठसा उमटवला आणि त्यांना गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले.
या महाकुंभामध्ये डॉ. अभिषेक वर्मा, योगगुरु अमित देव, लेफ्टनंट कर्नल अमरदीप सिंग, अध्यक्ष मंगेश त्रिवेदी जी आणि दीपक चौरसिया यांसारख्या अनेक नामवंत व्यक्तींची उपस्थिती लाभली. डॉ. अभिषेक वर्मा यांनी मुलांना ₹२१,०००/- चा सन्मान देताना सांगितले की, “योग ही आपल्या सनातन संस्कृतीची आत्मा आहे; ही परंपरा नवीन पिढीकडे पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे.”
‘योग महाकुंभ 2025’ हा कार्यक्रम केवळ एक योग महोत्सव नव्हता, तर महाराष्ट्राच्या ‘विशाल संपूर्ण आरोग्य संस्था’ च्या माध्यमातून पुण्याच्या योग परंपरेला, सामाजिक सेवेला आणि सांस्कृतिक मूल्यांना राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून देणारा एक ऐतिहासिक क्षण ठरला.
Celebrating Yoga Heritage – Dr. Vishal Gurav Honoured with ‘Adiyogi Yoga Bhushan Award
At the grand Yoga Mahakumbh 2025 in New Delhi’s Lajpat Bhavan, Pune’s Vishal Sampoorna Arogya Sangha and its founder Dr. Vishal Gurav were honoured with the prestigious ‘Adiyogi Yoga Bhushan Award’ for their remarkable 15-year contribution to yoga education and social upliftment. The event, featuring over 10,000 participants and eminent speakers like Dr. Abhishek Verma and Guru Amit Dev, also recognised Vijayalakshmi Gaikwad for women empowerment with the ‘Mahila Yoga Lakshmi Award’. This festival underscored yoga’s power as a tool for societal transformation and cultural preservation.
- #YogaMahakumbh2025
- #AdiyogiYogaBhushan
- #PuneYogaLeaders
+ There are no comments
Add yours