किती हजार करोडोंचा डायरेक्ट शेतकऱ्यांना लाभ वाचा :
आपला भारत देश हा जगात शेती प्रधान देश म्हणून ओळखला जातो, आपल्या देशातील 80 टक्के लोकांची उपजीविका ही शेती वरच अवलंबून आहे.
विविधतेने नटलेल्या आपल्या देशात अनेक सण उत्सव मोठ्या आनंदाने आणि गुण्यागोविंदाने साजरे केले जातात आणि प्रत्येक सण उत्सवा च्या माध्यमातून होणारे आर्थिक व्यवहारामुळे समाजातील अनेक घटकांना आर्थिक बळ मिळत असते
त्या पैकीच एक सण म्हणजे बकरी ईद किंवा ईद उल अझहा ग्रामीण अर्थव्यवस्थेला आत्मनिर्भर करणारा हा सण.
अश्या प्रकारे होते करोडो रुपयांची उलाढाल:
भारतात साधारण 20 करोड मुस्लिम समाज आहे त्या पैकी कमीत कमी 20 टक्के मुस्लिम बकरी ईद निम्मित धार्मिक आचरणाचा भाग म्हणून कुरबानी करत असतात.
या दरम्यान ईद च्या काळात शेतकऱ्यांना पशू धनापासून चांगलेच उत्पन्न उपलब्ध होत असते, किमान बारा हजार रुपया पासून ते लाखो च्या किमतीत बकऱ्यांचे बाजार भाव असतात.
सरासरी 15 हजार जरी प्रत्येकी भाव धरला तरी भारतात 4 करोड मुस्लिम बांधवांनी साधारण 15 हजार रुपये खर्च केले तरी 60 हजार करोड रूपयांपेक्षा रक्कमडायरेक्ट आपल्या देशातील शेतकऱ्याकडे जातात.
परत सांगतो 60 हजार करोड ची उलाढाल ही अगदी कमीतकमी बाजारभाव आणि कमीत कमी कुर्बानी करणारे मुस्लिम बांधव ग्राह्य धरल्यानंतर होत आहे, प्रत्यक्षात हा आकडा जास्तच असू शकतो यात कसलीच शंका नाही.
अफवेच्या बाजारात शेतकऱ्यांचे नुकसान:
देशातील शेतकरी वर्गाकडे या सणाच्या माध्यमातून जर 60 हजार करोड रुपया पेक्षा जास्त व्यवहार होत असेल तर अनेक अडचणी व गुंतागुंतीचा सामना करत असलेल्या बाजाराला सरकारने सुविधा आणि सुरक्षा देणे गरजेचे आहे.
विशेष म्हणजे अंबानी, अडाणी किंवा इतर मोठ्या उद्योगपतींचा सहभागा विना हा व्यवहार पूर्ण होत असते ज्या मुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी मदत देखील होत आहे.
एकी कडे चायना प्रॉडक्ट्स चे आपल्या बाजारपेठत झालेले अतिरेक आपण अनुभवत असताना बकरी ईद च्या माध्यमातून 100% स्वदेशी उत्पादन असलेल्या या व्यवहाराला बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर सरकारने पायाभूत सुविधा देऊन जाती धर्माचे, आणि वोट बँकेचे राजकारण सोडून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या व्यवसायासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.
मी ज्या क्षेत्रात राहतो त्या भागात किमान 80 बकरे प्रत्येक वर्षी पडतात. पण वाहतुकीच्या बंधन, व्हाट्स अप युनिव्हर्सिटी च्या माध्यमातून येणारे अफवा, विघ्न संतोषी लोकांचे राजकरण, आणि प्रशासनाच्या त्रासामुळे,भीतीमुळे त्यांची संख्या 10 वर आहे…
ईद जवळ येताच विशिष्ठ समूहातील लोकांतर्फे विखारी मेसेज वायरल केले जाते, #Bakralivesmatter सारखे trend पसरवले, आणि ईद न करण्याचे किंवा प्रतिकात्मक कुर्बानी करण्याचे सल्ले देऊ लागले ! अर्थात त्यांना फक्त धर्माचा द्वेष आहे. असो, परंतु त्यांनी दुसरी बाजू पण समजून घ्यायला हवी KFC, Mc Donald, Burger king या सारखे अंतरराष्ट्रीय फ़ूड चैन आर्थिक लाभा साठी आणी श्रीमंत लोकांची हौस पूर्ण करण्यासाठी दररोज करोड़ो पशुंचा जीव घेत असतात ज्या मध्ये कुठलीही सामाजिक जबाबदारी नसून फक्त अर्थकारण हेच उद्देश असतो आणी बकरी ईद च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पशुधनांस सर्वोच्च भाव प्राप्त होतोच त्या व्यतिरिक्त समाजिक जबादारी देखील पूर्ण केली जाते, कुर्बानी नंतर सम समान तीन भागात मांस विभागून एक स्वतः साठी तर समाजातील गोर गरीब, नातेवाईक यांनां उर्वरीत दोन हिस्से अगदी मोफत वाटप करण्यात येते. ज्या मुळे मानवी शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असणारे प्रोटीन, कॅलशियम आणी अन्य विटीमन्स ची पूर्तात या ईद मुळे अगदी सहज पणे पूर्ण करण्यात येते.
जरी ईद मुस्लिमांचा सण असला तरी अप्रत्यक्षपणे आर्थिक दृष्ट्या हा सण गैर मुस्लिमांशी निगडित आहे, कारण देशाच्या ग्रामीण भागात राहणारा शेतकरी वर्ग जो कि मोठया प्रमाणात हिंदू धर्मीय आहे, तो ग्रामीण वर्ग शेती आणि पशुपालन व्यवसाय करतो, ज्या प्रमाणे प्रत्येक प्रकारच्या व्यापारी वर्गाचा एक ठरविक सीजन असतो त्यात तो जास्त कमाई करतो, त्याच प्रकारे कुर्बानीची ईद हा पशुपालन व्यवसाय किंवा जोडधंदा करणाऱ्यासाठी एक सीजन असतो !!
ग्रामीण भागात चालणारे गोट फार्म किंवा शेळ्या, मेंढी पालन करणारा वर्ग कुर्बानीची ईद च्या 5-6 महिने आधी पासून आपल्या जनावरांची काळजी घेतो, त्यानां आहार आणि खुराक योग्य देण्यासाठी खर्च करतो, जेणेकरून ईद पर्यत चांगला प्राणी तयार केला तर ईद काळात जास्त पैश्याला विकता येईल व चांगला फायदा होईल !! त्याचप्रमाणे याच ईद च्या काळात चामडी उद्योग चा सुद्धा सीजन असतो, प्राण्यांचे मोठ्या प्रमाणावर चामडी उपलब्ध होतात त्याची खरेदी-विक्री होते, चामडी शी निगडित उद्योग जसे चप्पल, बॅग, इत्यादि. अनेक चामडी वस्तू आणि त्यांचा व्यापार याच सीजन मध्ये मोठ्या प्रमाणात होतो, त्यामुळे जरी हा सण मुस्लिमांचा असला तरी आर्थिक दृष्टीने गैर मुस्लिमांशी निगडित आहे.
अफवेच्या बाजाराने यंदा कुकूटपालन मधून सावरणारा शेतकरी डबघाईला आलेला आपण पाहिला, याच अफवे मूळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केली.
याबाबीचा विघ्न संतोषी राजकारण करणाऱ्या लोकांनी धर्माचा चष्मा काढून विचार करावा.
सर्वाना ईदच्या शुभेच्छा ! शासनाच्या नियमाचे पालन करून ईद साजरी करा !
आदम अली सय्यद.
+ There are no comments
Add yours