शिक्षक दिनानिमित्त मावळात गुरुजनांचा सन्मान – आदर, शिक्षण आणि पर्यावरणाचा सुंदर संदेश

1 min read

Teachers Honored in Maval – A Celebration of Respect, Education, and Environment

Anil Ghare

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB

मावळ (प्रतिनिधी): 09 Sep 2025:
शिक्षक दिन हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून समाज घडवणाऱ्या गुरूंच्या योगदानाचा उत्सव असतो. यंदाही राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल मावळच्या पुढाकाराने हा दिवस एका अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल चांदखेड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदखेड, आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंदनवाडी ठाकरवस्ती या तीन शाळांमध्ये आयोजित कार्यक्रमात गुरुजनांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे नेतृत्व मावळचे लोकप्रिय आमदार श्री. सुनील आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली महिला अध्यक्षा सौ. ज्योतीताई भरत राजीवडे यांनी केले. गुरुजनांना प्रशस्तीपत्र, भेटवस्तू, झाडाचे रोपटे आणि गुलाबाचे फूल देऊन गौरवण्यात आले. शिक्षणाबरोबरच पर्यावरणाची जाणीव निर्माण करण्यासाठी झाडांचे रोपटे भेट देण्याचा अभिनव उपक्रमही राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सुवर्णाताई राऊत (महिला अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस, मावळ) तर प्रमुख मान्यवर म्हणून सौ. मीनाताई माळी (सरपंच, चांदखेड), सौ. सुनिताताई येवले (सरपंच, पाचाणे), श्री. आजिनाथ ओगले (मुख्याध्यापक), सौ. रेखा भावे, श्री. विकास रासकर आदी उपस्थित होते.

दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि बा.रा. घोलप यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. सौ. शुभांगी पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर मुख्याध्यापक श्री. आजिनाथ ओगले यांनी प्रस्तावना मांडली.

ग्रामभागात शिक्षकांचे योगदान मोठे असते, मात्र अनेकदा त्याचा योग्य सन्मान होत नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचा हा उपक्रम आदर्श ठरतो. झाडाचे रोपटे भेट देणे हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश तर प्रशस्तीपत्र देणे हे शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करणारे पाऊल ठरले.

  • शिक्षक दिन 2025 मावळ
  • न्यू इंग्लिश स्कूल चांदखेड कार्यक्रम
  • राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल
  • Teachers’ Day Maharashtra rural
  • पर्यावरण आणि शिक्षण उपक्रम
  • Chandkhed Teachers’ Day celebration

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours