विमाननगरला तीव्र पाणीटंचाई; मॉल-टेकपार्कला मात्र लाखो लिटर पुरवठा

1 min read

Water Crisis in Viman Nagar: Citizens Struggle, Malls & Tech Parks Get Lakhs of Litres Daily

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा => https://shorturl.at/7ovv7

Pune | 01 ऑक्ट – (प्रतिनिधी) – विमाननगरमधील रहिवासी गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहेत. अनेक सोसायट्यांमध्ये चार-चार दिवस नळ कोरडेच राहतात, आणि पाणी आल्यास तो फक्त तासाभरापुरता व कमी दाबाचा पुरवठा असतो. पिण्याचे पाणी, स्वयंपाक, स्नान आणि दैनंदिन गरजांसाठी त्रस्त नागरिकांना आता टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

पण त्याच वेळी, शेजारीच असलेल्या फिनिक्स मॉल आणि पंचशील टेकपार्कला दररोज मनपाकडून अंदाजे ४–५ लाख लिटर पाणी सहज उपलब्ध होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.

चंद्रकांत जगधने चा इशारा : सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जगधने यांनी महापालिकेकडे निवेदन सादर करून प्रशासनावर कठोर टीका केली.
ते म्हणाले – “पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत व घटनादत्त हक्क आहे. व्यावसायिक प्रकल्पांना लाखो लिटर पाणी उपलब्ध करून देणे आणि सामान्य कुटुंबांना वंचित ठेवणे हा थेट अन्याय आहे. हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे उदाहरण आहे. जर तातडीने दखल घेतली नाही, तर नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागेल.”

त्यांनी प्रशासनाला मागणी केली –

  • विमाननगर वसाहतींना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करावा.
  • मॉल व टेकपार्कच्या पाणी कनेक्शनची कायदेशीर पडताळणी करावी.
  • पाणीपुरवठ्यात नागरिकांना प्राथमिक हक्क द्यावा.

आकडेवारी :

  • पुणे मनपाच्या आकडेवारीनुसार, शहराला दररोज सुमारे १७.५ टीएमसी पाण्याची गरज आहे.
    मात्र, नियोजनाचा अभाव, गळती व अनियमित पुरवठा यामुळे नागरिकांना सरासरी ३०–४०% कमी पाणी मिळते.
    पुणे शहरातील सुमारे ७५% टँकर बाजार हा अनधिकृत असल्याचेही अनेक वेळा निदर्शनास आले आहे.



Viman Nagar water shortage, Pune water crisis, mall vs residents water supply, Pune citizens protest water issue

Residents of Viman Nagar, Pune, are facing an acute water shortage, with taps running dry for days and families forced to rely on costly water tankers. Meanwhile, commercial giants like Phoenix Mall and Panchshil Tech Park reportedly receive 4–5 lakh liters of daily municipal water supply. Social activist Chandrakant Jagdhane has demanded immediate corrective action, warning of mass protests if citizens’ basic rights continue to be ignored. The controversy raises serious questions about the fairness of Pune’s water distribution system.

  • विमाननगर पाणीटंचाई, पुणे पाणी संकट,
  • नागरिक वि मॉल पाणीपुरवठा,
  • पाणीप्रश्न पुणे,
  • पाणी आंदोलन
  • Viman Nagar water shortage,
  • Pune water crisis, mall vs residents water supply,
  • Pune citizens protest water issue

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours