पुणे महानगरपालिका निवडणुकी साठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) तर्फे ८ विधानसभा मतदारसंघांतून २५२ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

1 min read

NCP (Sharadchandra Pawar) Takes the Lead in Pune Civic Poll Preparations; 252 Aspirants Interviewed from 8 Assembly Constituencies

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा => https://shorturl.at/7ovv7

Pune | 19 Dec 25 – (प्रतिनिधी) – आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाने संघटनात्मक पातळीवर आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. पक्षाच्या वतीने गुरुवार, दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. या एकदिवसीय प्रक्रियेत पुणे शहरातील ८ विधानसभा मतदारसंघांतून तब्बल २५२ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या, ही संख्या शहरातील राजकीय वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाबाबत वाढत असलेल्या उत्साहाचे द्योतक मानली जात आहे.

‘इच्छुक उमेदवारांची संख्या म्हणजे जनतेचा कौल’ – प्रशांत जगताप : या संदर्भात बोलताना पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले की,

“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाकडे मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार येत आहेत, हा कल जनतेच्या मनातील विश्वास आणि अपेक्षा स्पष्ट करणारा आहे.”

त्यांच्या मते, आगामी महानगरपालिका निवडणुकीत शहराच्या विकासासाठी सक्षम, अभ्यासू आणि लोकांशी जोडलेले उमेदवार देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.

राजकीय विश्लेषण | पुण्यात राष्ट्रवादीची संघटनात्मक ताकद : राजकीय निरीक्षकांच्या मते, २५२ इच्छुक उमेदवारांची उपस्थिती ही केवळ आकडेवारी नसून, पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची संघटनात्मक पकड, कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि मतदारांमधील विश्वास याचे द्योतक आहे. आगामी निवडणुकीत पक्षाकडून प्रबळ आणि अभ्यासपूर्ण उमेदवारांची यादी सादर होण्याची शक्यता यामुळे बळावली आहे.


Do 252 Aspirants Signal Public Support? Is NCP (Sharadchandra Pawar) Gaining Ground in Pune?”

The Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar faction) has taken a clear lead in preparations for the upcoming Pune Municipal Corporation elections. On December 18, 2025, the party conducted interviews of 252 aspiring candidates from eight assembly constituencies at its Shivajinagar office. According to Pune city president Prashant Jagtap, the overwhelming response reflects growing public confidence in the party. Senior leaders were present throughout the day-long process, indicating a strong organizational push ahead of the civic polls.

NCP Sharad Pawar Pune, Pune Municipal Election 2025, NCP Candidate Interviews, Prashant Jagtap NCP, Pune City Politics

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours