Nina Oswal has been honored with the “Pride of Maharashtra” award by the Maharashtra Book of Records.
पुण्यातील समाजसेविका नीना ओसवाल यांनी महिला सशक्तीकण, समाज कल्याण, महिला सुरक्षा या क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेत, महाराष्ट्राच्या प्रगती आणि समृद्धिसाठी केलेल्या अत्यंत महत्त्वाच्या योगदाना च्या सन्मानार्थ महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस तर्फे
पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, डेक्कन, येथे दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन करून, नीना ओसवाल यांना “प्राइड ऑफ महाराष्ट्र” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पोलिस उप आयुक्त संदीप सिंग गील, माजी राज्यमंत्री ज्ञानेश्वर कांबळे, MIT WPU चे डायरेक्टर डॉ.महेश थोरवे, साह्यायक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलांडे, अभिनेता गुरमित सिंग, हंसराज जगताप,प्रतीक लाड, माजी सैनिक सेल चे दीपक राजे शिर्के, श्रीमंत काळे, टॅलेंट कॉर्प सोल्युशन चे डायरेक्टर महेबुब सय्यद आदी मान्यवर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.
महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स ही एक अशी संस्था आहे ज्याचा उद्देश आपल्या राज्याच्या विविध क्षेत्रात समृद्धी, भरभराटी, तसेच अभिमानास्पद व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या असामान्य व्यक्तींचा गौरव, कौतुक आणि सन्मान करणे हा आहे, जेणे करून अश्या व्यक्तिंना उर्जा मिळावी व आणखी जोमाने उत्कृष्ट कार्य करण्यास बळ प्राप्त व्हावे तसेच त्यांचा आदर्श घेऊन समाजातील इतर वर्गातून देखील आणखी प्रेरणादायी कार्य निरंतर सुरू राहावे अशी माहिती महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स चे अध्यक्ष आदम सय्यद यांनी दिली.
या वेळी सर्व मान्यवरांनी नीना ओसवाल यांचे अभिंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड चे अध्यक्ष आदम सय्यद, उपाध्यक्ष सतिश राठोड, सेक्रेटरी स्नेहा कुलकर्णी, लकी साळुंके यांनी उत्तम उपक्रम राबविल्या बद्दल कौतुक केले.
+ There are no comments
Add yours