धक्कादायक! लोणावळ्यात पॉर्न व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या, ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी तयार करत होते अश्लील व्हिडिओ..

1 min read

शिक्षणाचे माहेरघर समजले जाणारे पुणे आता गुन्हेगारीचे माहेरघर बनत चालले आहे…

porn video-making racket busted at lonavala by pune rural police

प्रतिनिधी: अनिल घारे.

गुन्हेगारीच्या विळख्यात आडकलले “सुसंस्कृत” पुणे काही ही केल्याने गुन्हेगारी मुक्त होत असताना दिसत नाही… जागतीक ड्रग्स कनेक्शन, गँगवॉर, गोळीबार, अश्या एकामागून एक कलंकित प्रकरणे ताजे असताना आता त्यात आणखी पॉर्न व्हिडिओ प्रकाराची भर पडली आहे…

शिक्षणाचे माहेरघर समजले जाणारे पुणे आता गुन्हेगारीचे माहेरघर बनत चालले आहे…

पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे हे पोलिसांसमोरचे मोठे आव्हान बनले आहे. कायदे कठोर करूनही गुन्हेगारी थांबत नाही. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. पॉर्न व्हिडीओ (Porn video) बनवत असताना पोलिसांनी छापा टाकून टोळीला अटक केली आहे. 

देशात अश्लील व नग्न चित्रीकरण तसेच प्रसारण करण्यास बंदी असताना देखील स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी अश्लील चित्रफित बनविणाऱ्या 15 जणांसह त्यांना बंगला भाड्याने देणाऱ्या तीन जणांवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात  आयपीसी 292, 293, 34 सह माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2008 कायदा कलम 67, 67 (A), स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण अधिनियम 1986 कायदा कलम 3, 4, 6, 7 प्रमाणे शुक्रवारी (29 मार्च) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार,  वेगवेगळ्या अश्लील ओ.टी.टी प्लॅटफॉर्मसाठी (Porn OTT Platform) काही तरुण आणि तरुणी लोणावळ्यातील व्हीलावर पॉर्न व्हिडिओ तयार करत होते. भारता पॉर्न व्हिडिओ करण्यावर बंदी असताना 15 जण लोणावळ्यात बिनधास्त पॉर्न व्हिडिओ तयार करत होते. काही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी पॉर्न व्हिडिओ शूट करण्यासाठी लागणारे कॅमेरे आणि इतर साहित्य जप्त केले आहे. यातील काही व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागले असून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या टोळीतील 15 पैकी 13 जणांना अटक केली आहे.

 ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख (SP Pankaj Deshmukh), अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे (Addl SP Ramesh Chopade), सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक (IPS Satya Sai Karthik) यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने केली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ (Sr PI Kishor Dumal) करत आहेत.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours