प्रतिनिधी: अनिल घारे. (टाईम्स ऑफ पुणे, मावळ)
मावळ : भारतीय राज्यघटने चे शल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो व⁹र्षापासून सुरू असलेला कु प्रथांचा नायनाट करून देशातच नव्हे तर संपूर्ण जगात क्रांती निर्माण केली, बाबासाहेब हे समाजसुधारक तर होतेच पण त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात देखील मोलाची कामगिरी बजावली आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीत एतीहासिक बदल घडवला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त मावळ तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकीच पवनानगर येथे वेगळाच जोश दिसून आला, मावळचा रावा फेम मिलिंद शिंदे यांचा भीम गीताच्या कार्यक्रमाने वेगळीच ऊर्जा निर्माण केली, या वेळी ढोल-ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शेकडो नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते.
दरम्यान पंचशील ध्वजारोहण आणि बुद्धपूजा करण्यात आली, त्यानंतर प्रसिद्ध वक्ते शिवश्री संपतराव गारगोटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आणि कार्यावर प्रकाश टाकणारे व्याख्यान सादर केले.यानंतर एडवोकेट वनराज शिंदे उच्चतज्ञ हायकोर्ट मुंबई यांनीनी प्रमुख पाहुणे म्हणून भाषण केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यक्रमाचे मा. माऊली (ज्ञानेश्वर )सोनवणे, संस्थापक जमीन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य हे होते. या वेळी दिनकर नाना शेटे तालुका अध्यक्ष जमीन हक्क परिषद,करुणाताई सरोदे महिला अध्यक्षा जमीन हक्क परिषद,संगीताताई घोडके जमीन हक्क परिषद,
जालिंदर गोंटे सचिव जमीन हक्क परिषद, सागर राक्षे,चंद्रकांत शिंदे, पै. चंद्रकांत सातकर, रामदास आप्पा काकडे, दत्ता अण्णा पडवळ, किरण भाऊ राक्षे,खंडू तिकोने, एडवोकेट अरुण जाधव,माऊली केदारी, तानाजी पडवळ, सुनील गुजर, सुभाष धामणकर, नितीन वाघमारे, युवराज जी पोटे, प्रमुख पाहूणे म्हणून ह्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा देत त्यांच्या शिकवणींचे पालन करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती समितीचे अशोक जाधव, राजू वरघडे, तानाजी गोळे, फरीद भाई शेख, रमेश विखार,याकूब भाई शेख, दत्ता निंबळे,कांताराम भवारी, दिनेश जाधव, दत्ता वाघमारे, डीपी मोरे,तुकाराम दळवी, पांडुरंग तुपे, स्वप्निल आंबोले यांनी अथक परिश्रम घेतले.
+ There are no comments
Add yours