भेकर प्रजातीच्या वन्य प्राण्याचे मांस,बनावट बंदूक जप्त; तीन आरोपी अटकेत..

0 min read

भेकर हे शेड्यूल 2 मध्ये येणारे वन्य प्राणी आहेत आणि त्यांची शिकार करणे बेकायदेशीर आहे.

पुणे, 22 जून 2024: दिनांक 19/06/2024 रोजी प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे, पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक (प्रा.) मा. श्री. एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक (प्रा.) मा. श्री. महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक मा. आशुतोष शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वडगाव मावळ श्री. हनुमंत जाधव यांच्या नेतृत्वात एक विशेष धाड टाकण्यात आली.

मौजे मळवंडी थुले येथे वन्य प्राण्यांच्या शिकारीविरुद्ध ही धाड टाकण्यात आली असता, भेकर प्रजातीच्या वन्य प्राण्याचे (शेड्युल 2) शिजवलेले मांस आढळून आले. धाडीत मानवी बनावटीच्या दोन बंदुका, एक कोयता, एक भाला, एक काडतूस, छरा, एक गॅस सिलेंडर, आणि एक शेगडी इत्यादी सामान जप्त करण्यात आले.

सदरील घटनेतील आरोपी गंगाराम धोंडीबा आखाडे (वय 36 वर्ष), सुनील ठोकू कोकरे (वय 36 वर्ष), आणि सुमित तुकाराम गुरव (वय 17 वर्ष) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या अंतर्गत गुन्हा केला असल्याचे नोंदवले गेले आहे.

आरोपींविरुद्ध पुढील तपास चालू असून, आरोपींना वन विभागाच्या ताब्यात ठेवण्यात आले आहे.

धाडीत सहभागी अधिकारी व कर्मचारी:

  • श्री. हनुमंत जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडगाव मावळ
  • श्रीमती दया डोमे, वनपरिमंडळ अधिकारी
  • श्री. साईनाथ खटके, नियतक्षेत्र वन अधिकारी
  • श्री. संदिप अरुण
  • श्रीमती आशा मुंढे
  • श्रीमती सोनाली शेळके
  • श्री. अमीर सय्यद
  • श्री. विशाल सुतार, वनसेवक

वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी सहकार्य करावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल लक्षात आल्यास त्वरित वन विभागाशी संपर्क साधावा.

कारवाईचे तपशील:

  • भेकर हे शेड्यूल 2 मध्ये येणारे वन्य प्राणी आहेत आणि त्यांची शिकार करणे बेकायदेशीर आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने मळवंडी ठुले येथे धाड टाकली असता, तिथे भेकरचे शिजवलेले मांस, मानवी बनावटीची बंदूक (2), कोयता (1), भाला (1), काडतूस (1), छरा, गॅस सिलेंडर (1) आणि शेगडी (1) जप्त केली.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours