पत्रकार तैनुर शेख यांना प्रतिष्ठित ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’

1 min read

पुणे, 24 जून: लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना आवाज देणारे आणि सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील पत्रकार तथा वतन की लकीर या वृत्तपत्राचे संपादक तैनुर शेख यांना ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

भ्रष्टाचाराविरोधात धारदार लेखणीने लढा देणारे आणि समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असलेले शेख यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेतली गेली आहे.

या पुरस्काराचे आयोजन पुण्यातील समजिक संघटना सूर्योदय प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले होते.

मान्यवरांच्या उस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा

सूर्योदय प्रतिष्ठान आयोजित एका भव्य कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाजपा कामगार जिल्हा उपाध्यक्ष किशोर अहिरे यांनी भूषवले होते. यावेळी सूर्योदय प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा प्रतिभाताई पाटील, यशदाचे माध्यम व प्रकाशन केंद्र विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड, पद्मावती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय दगडे, माजी नगरसेविका संगीता ठोसर, भारती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, आमदार योगेश टीळेकर, कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पिंपरी चिंचवड पुणे खानदेश मराठा मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार आणि कौतुक

पुरस्कार वितरणानंतर डॉ. बबन जोगदंड आणि किशोर अहिरे यांनी तैनुर शेख यांच्या पत्रकारितेतील कार्याचे कौतुक केले. तसेच, शेख यांनीही पुरस्कार स्वीकारून कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, सूर्योदय प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्कारा मुळे जबाबदारी वाढली

पत्रकार तैनुर शेख यांना मिळालेला हा ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ केवळ एक पुरस्कार नाही तर समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेल्या पत्रकारांना प्रेरणा देणारा आहे. अशा पुरस्कारांमुळे पत्रकारांचे मनोबल वाढते आणि ते समाजासाठी अधिक चांगले काम करण्यास प्रवृत्त होतात.

दरम्यान पत्रकार तैनुर शेख यांना ‘आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल राजकी, शैक्षणि, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि न्याय, समानता यासाठी लढा देण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहोत हीच टाईम्स ऑफ पुणे टीम च्या वतीने शुभेच्छा!

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours