विधानसभेच्या ५० जागा लढणार: माजी मंत्री बबनराव घोलप यांची घोषणा..

1 min read

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्यस्तरीय कार्यकर्ता संमेलन व पुरस्कार वितरण समारंभात माजी मंत्री बबनराव घोलप यांनी विधानसभेच्या ५० जागा लढवण्याची घोषणा केली.

चर्मकार समाजाचे दहा-पंधरा आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत आहेत, मात्र ते समाजाचा आवाज उचलत नाहीत राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या विचाराचा आमदार विधानसभेत गेला पाहिजे त्यासाठी महासंघाद्वारे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून 50 उमेदवार उभे करणार आहे, अशी घोषणा माजी सामाजिक कल्याण मंत्री व चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांनी केली, तसेच पुढे म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यकर्ते जमात होण्याचा संदेश दिला होता, पण समाज त्यांचे विचार पूर्ण करू शकला नाही, बाबासाहेबांचे विचार खरे करण्यासाठी समाजाने एकत्र आले पाहिजे, असे यावेळी व्यक्त केले.

चर्मकार महासंघाचे राजकीय भूमिका आणि चर्मोद्योग व्यवसाय या विषयावर चर्चा झाली यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला प्राध्यापक देवानंद चव्हाण विद्या भूषण श्री दत्तात्रय डोळस समाजभूषण श्री मिथुन गजरे नव युवा उद्योजक पौर्णिमा उंबरकर नवा महिला उद्योजक म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच राज्यस्तरीय कार्यकारिणी जाहीर करून पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र दिले.


भोसरी येथे अंकुशराव लांडगे नाट्यगृहात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार महेश लांडगे चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय सचिव व संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष कष्टकरांचे नेते बाबा कांबळे, डॉक्टर मेहबूब भाई सय्यद: उपाध्यक्ष वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड,भानुदास विसावे, महिला अध्यक्षा सरोज बिसूरे, उर्मिला ठाकरे प्रदेश अध्यक्ष माधव गायकवाड, डॉ, शांताराम कारंडे, प्रदेश निरीक्षक प्रा शशिकांत सोनवणे, राष्ट्रीय सचिव दत्तात्रेय गोतीसे राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद गवळी, सुदाम लोखंडे युवक प्रदेशाध्यक्ष रवींद्र खैरे, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सुवर्णा माने, अमर तांडेकर, पुणे जिल्हा अध्यक्ष विजेंद्र गद्रे बापू सोनवणे , पुणे शहर अध्यक्ष संतोष टोणपे यांच्या सहित राज्यातील अंकुश आंबेकर सुखदेव आबनावे अभिनंदन तिचे दामोदर पवार मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

समारोप प्रसंगी माजी राज्यमंत्री ज्ञानेश्वर कांबळे यांच्या वाढदिवस व अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला , संयोजन श्री संतोष वाघमारे सुदाम कांबळे दत्तात्रय शिंदे सरकार प्रल्हाद कांबळे विजय आडसुळ, तर शशिकांत सोनवणे यांनी प्रास्ताविक केले व प्रा. दत्तात्रय शिंदे यांनी आभार मानले.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours