महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे कारगिल विजय रौप्य महोत्सव साजरा..

1 min read

भारतीय सैन्य दलातील कारगिल योद्धा तसेच वीर पत्नी व मातांचा कृतज्ञापूर्वक सन्मान…

26 जुलै रोजी कारगिल विजय दिवसाला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे 2 ऑगस्ट रोजी पुण्यातील नेहरू सांस्कृतिक भवन येथे शेकडो माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता यांचा सन्मान सोहळा आयोजित करून “कारगिल शौर्य उत्सव” साजरा करण्यात आला.

जगातील सर्वात कठीण युद्धांमध्ये कारगिल युद्धाची गणना केली जाते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत भारताने हे युद्ध जिंकले. भारतीय सैन्य दलाने वेळोवेळी जगाला आपले सामर्थ्य आणि शौर्याचे प्रदर्शन करत शत्रू राष्ट्रांना दाखवून दिले की कोणत्याही प्रकारे आपल्या मायभूमीकडे वाकड्या नजरेने बघणार्‍याला निस्तेनाबूत करण्याची क्षमता भारतीय सैन्य दलात आहे. भारतीय सैन्य दलाच्या सेवा, समर्पण आणि शौर्य प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स चे अध्यक्ष आदम सय्यद यांनी दिली.

जवान सीमेवर लढताना वीर माता आणि वीर पत्नीं यांनी अनुभवलेल्या कडवा संघर्षाची कथा ऐकून, पुण्यातील फायरब्रँड महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील व संगीता तिवारी यांनी त्या वीर महिलांना अक्षरशः साष्टांग दंडवत करून कृतज्ञता व्यक्त केली.

त्यांचे सामर्थ्य आणि समर्पणाची महानता दर्शवणाऱ्या या क्षणी, त्या वीर महिलांनी दाखवलेले अद्वितीय धैर्य आणि बलिदानास मान्यवरांना तर्फे मानवंदना देण्यात आली

या कार्यक्रमात आपल्या साहसकथा आणि अनुभवांचे वर्णन तसेच आपल्या सहकाऱ्यांचे स्मरण करत माजी सैनिकांनी सभागृहाचे वातावरण भारावून सोडले.

या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना “प्राइड ऑफ महाराष्ट्र” या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यामध्ये समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश होता.

मागील वर्षी कोथरूड पोलिसांनी आतंकवाद्यांना पकडून राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेला केलेल्या बहुमोल योगदानाबद्दल शूरवीर पोलीस पुरस्काराने महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे सन्मानीत करण्यात आले. या पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्याची प्रशंसा करतांना कार्यक्रमात त्यांच्या धाडसाची आणि तत्परतेचे कौतुक करण्यात आले.

एस एस सिनेविजन तर्फे पर्यावरण जनजागृतीवर आधारित “सई” या शॉर्ट फिल्मचे पोस्टर लॉन्चिंग या वेळी करण्यात आले. या फिल्मचे उद्दिष्ट पर्यावरण संरक्षणाबद्दल जनजागृती करणे हे आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. महेबुब सय्यद, उपाध्यक्ष तसेच टाईम्स ऑफ पुणे चे पत्रकार सतीश राठोड, सचिव स्नेहा कुलकर्णी, अनिल घारे यांनी केले होते.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती: रुपाली ताई ठोंबरे पाटील, सिने निर्माता सिकंदर सय्यद, इंडियन एअर फोर्स विंग कमांडर एम तिरुमरण, संगीताजी तिवारी, माजी सैनिक सेलचे प्रदेश अध्यक्ष दीपक राजे शिर्के, वास्तु विशारद अखिलेश राजगुरू, उद्योजक संदीप राठोड, अँड. मेघना धुमाळ,मुंबई हाईकोर्ट, आणि शिवलक्ष्मी आई साहेब, महामंडलेश्वर किन्नर अखाडा यांनी उपस्थित राहून या सोहळ्याला गौरव दिला.

कार्यक्रमात विशाल आरोग्य संस्थेच्या विद्यार्थ्यांनी भारतीय सैन्य दलाच्या शौर्यगाथांचा संगीतमय सादरीकरण करण्यात आले, ज्यामुळे उपस्थितांना भारावून टाकले. या कार्यक्रमाने सर्वांना प्रेरित केले आणि सैन्य दलाच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी दिली.

TIMES OF PUNE

सर्व महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा : https://ln.run/MCeiB

Kargil Victory Silver Jubilee

Maharashtra Book of Records

Kargil Vijay Diwas 25th Anniversary

Kargil Warriors Honor Ceremony

Pride of Maharashtra Awards

Kothrud Police Anti-Terrorism Honor

SS Cinevision “Saiee” Short Film Launch

Event Organizers Maharashtra Book of Records

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours