माजी सैनिकांसाठी राष्ट्रवादी सैनिक सेल तर्फे विविध मागण्या! अजित पवारांचे लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन.
पुणे: स्वतंत्र दिन आणि कारगिल विजय दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त, 15 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माजी सैनिक सेलतर्फे लोहगाव, पुणे येथे ‘माजी सैनिक संवाद व सन्मान सोहळा’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रमुख उस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली, त्यानंतर कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर सैनिकांना मानवंदना देण्यात आली आणि अमर जवान स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
या वेळी, कारगिल युद्धातील शहीद सैनिकांच्या वीर-पत्नींना आणि माजी सैनिकांना सन्मानित करण्यात आले.
सैनिक संवादादरम्यान, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांनी माजी सैनिकांच्या खालील मागण्यांवर आपल्या भाषणात चर्चा केली आणि यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा विश्वास व्यक्त केला:
- लोहगावमध्ये शहीद स्मारक व सैनिक भवन स्थापन करणे.
- पुणे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाची इमारत विस्तारित करणे.
- गावातील पोलीस पाटील पद माजी सैनिकांसाठी राखीव ठेवणे.
- माजी सैनिकांना राजकीय क्षेत्रात आरक्षण देणे.
- ग्रामपंचायत तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपद माजी सैनिकांसाठी राखीव ठेवणे.
- युद्धात शहीद झालेल्या वीर पत्नींना आणि मुलांना सरकारी नोकरीत आरक्षण देणे.
- सैनिक कल्याणासाठी स्वतंत्र मंत्र्याची नियुक्ती करणे.
कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित माजी सैनिकांनी “भारत माता की जय” अशा घोषणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलच्या वतीने आयोजित या सोहळ्यात मोठ्या संख्येने माजी सैनिक उपस्थित होते, याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले.
या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. सूरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष श्री. सुरेश घुले, प्रदेश सरचिटणीस श्री. लतिफ तांबोळी, तसेच लोहगावमधील ज्येष्ठ नेते श्री. पांडुरंग खेसे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
+ There are no comments
Add yours