Over One Lakh Beneficiaries of Chief Minister’s Mazi Ladki Bahini Scheme in Maval Taluka, Success Due to Extensive Awareness Campaign : MLA Sunil Shelke
वडगाव मावळ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अधिकाधिक माता-भगिनींना लाभ मिळावा यासाठी मावळ तालुक्यात विविध ठिकाणी जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. स्थानिक नोंदणी केंद्रांची स्थापना करून, ही योजना मावळ विधानसभेत प्रभावीपणे अमलात आणण्यात आली आहे. या मोहिमेच्या प्रभावामुळे, आतापर्यंत मावळ तालुक्यातील एक लाख तीन हजार 178 माता-भगिनी या योजनेसाठी पात्र ठरल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
या संदर्भात मावळ तहसीलदार कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीचे अध्यक्षस्थान मावळचे आमदार सुनील शेळके यांनी भूषवले. आमदार शेळके यांनी सांगितले की, काही भगिनींचे अर्ज अपूर्ण असल्यामुळे किंवा अर्धवट कागदपत्रांमुळे त्यांना योजनेचा लाभ मिळू शकला नाही. अशा अर्जदार भगिनींनी लवकरात लवकर आपल्या अर्जांची पूर्तता करावी. यासाठी अधिकृत केंद्रांवर किंवा अंगणवाडी सेविकांकडे अर्ज भरले जावेत, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीत मावळ तहसीलदार विक्रम देशमुख, हवेली तहसीलदार जयराज देशमुख, गट विकास अधिकारी सुधीर भागवत, एकात्मिक बालविकास अधिकारी विशाल कोतागडे, वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी प्रवीण निकम, देहू नगरपंचायत मुख्याधिकारी निवेदिता घाडगे, तसेच तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उप मुख्याधिकारी ममता राठोड आदी अधिकारी उपस्थित होते.
तालुक्यातील कोणत्याही पात्र माता-भगिनी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये : आमदार सुनील शेळके
आमदार सुनील शेळके यांनी बैठकीत अर्जांची सखोल पडताळणी केली व मंजूर अर्जांबाबत चर्चा केली. अंगणवाडी सेविका व प्रशासनातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना येणाऱ्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. त्यांनी सांगितले की, महायुती सरकारच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची आहे. तालुक्यातील कोणत्याही पात्र माता-भगिनी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी काळजी घेतली आहे.
Chief Minister’s Mazi Ladki Bahini Yojana, Maval constituency beneficiaries, women empowerment schemes in Maharashtra, maternal welfare schemes, Sunil Shelke MLA, registration centers for women schemes, women’s financial independence, government schemes for women in Maval, Maharashtra government schemes for mothers and sisters, CM’s Mazi Ladki Bahini scheme benefits.
+ There are no comments
Add yours