लोंढे कुटुंबाला न्यायासाठी प्रतीक्षा, प्रशासनाचे आश्वासन मात्र अद्याप कोणतीही कारवाई नाही..

2 min read

Londhe Family Still Awaits Justice; Administration’s Promise, But No Action Yet

पुणे : बाणेर येथील आंबेडकर नगरमध्ये राहणाऱ्या संतोष लोंढे आणि त्यांच्या कुटुंबीयांना बांधकाम व्यावसायिकाकडून सतत त्रास दिला जात आहे. यावर कारवाईसाठी लोंढे कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग पाच दिवस उपोषण केले. तहसीलदारांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले आणि दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आठ दिवस उलटून गेले तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.

संतोष लोंढे यांच्या मालकीच्या जागेवर बांधकाम व्यावसायिकांनी दावा केला असून, त्यांचा त्रास सतत सुरू आहे. या प्रकरणी पुणे पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रारी नोंदवूनही कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे लोंढे कुटुंबाने संतप्त होऊन उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. उपोषण संपल्यानंतर आठवडाभराच्या कालावधीत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने लोंढे कुटुंबीय नाराज आहेत.

मागासवर्गीय असल्यामुळे बांधकाम व्यावसायिकाकडून लोंढे कुटुंबाला सतत धमक्या दिल्या जात आहेत. या प्रकरणात लोंढे कुटुंबाला जल, विद्युत, आणि रस्त्याच्या सुविधांवर अडथळे आणले जात आहेत. त्यांनी प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही कोणतेच योग्य पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे लोंढे कुटुंब आणि त्यांच्या समर्थकांनी या व्यवसायिकाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे.

मांग गारुडी समाज युवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरीष सकट यांनी देखील या मुद्द्यावर आवाज उठवत सांगितले की, अनुसूचित जातीतील लोंढे कुटुंबावर बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध सर्व समाज एकत्र येणार आहे. त्यांनी प्रशासनाला तात्काळ कारवाई करण्याचे आवाहन केले, अन्यथा संपूर्ण समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असे इशारा दिला आहे.

यावेळी केशव राखपसरे, गब्बर कसबे, रवी कसबे आणि इतर समाजबांधवांनीही प्रशासनाकडून लोंढे कुटुंबाला संरक्षण मिळावे आणि बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल होण्यासाठी कारवाई व्हावी अशी मागणी केली.

The Lonhde family from Baner, Pune, has been facing ongoing harassment from a construction developer who is pressuring them for their land. Despite filing multiple complaints with local authorities, no action has been taken. After a five-day hunger strike outside the district collector’s office, officials assured the family of action against the developer, but eight days have passed without any progress. The family and community members express their frustration and warn of widespread protests if the authorities continue to neglect the issue.

Lonhde family justice, Baner land dispute, builder harassment case Pune, scheduled caste discrimination Baner, builder pressure for land, protest at Pune district collector office, Lonhde family hunger strike, Pune construction dispute, no action after administrative promises, builder vs landowner dispute Pune.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours