Hyundai Steel, Sangam Hi-Tech, and FNTI India to Set Up Operations, Pune to See ₹2240 Crore Investment from 9 Companies; 2640 Jobs to be Created
दक्षिण कोरियाची प्रसिद्ध ह्यूदांई स्टील ही कंपनी तळेगाव दाभाडे औद्योगिक क्षेत्रात लवकरच कार्यान्वित होत आहे. त्याचबरोबर संगवू हायटेक, एन्व्हीएच इंडिया, पीएचए इंडिया, कोमोस ऑटोमोटिव्ह, डुवन ऑटोमोटिव्ह, पॅराकोट प्रॉडक्ट, मूव्हमॅक्स सिस्टिम व लॉजिस्टिक प्युअर ऑल या अन्य ८ कंपन्यांचेही दाभाडे औद्योगिक क्षेत्रात आगमन होणार आहे.
ह्यूदांई स्टीलसह नऊ कंपन्या तळेगाव दाभाडे येथे २२६० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून माध्यमातून २६४० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. आर. एम. के. स्पेसेसने या कंपन्यांना ७० एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. या जागेचा मालकी हस्तांतरण प्रक्रिया झाली आहे.
#TIMESOFPUNE महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB
आर. एम. के. स्पेसेसचे (RMK Spaces ) कार्यकारी संचालक रणजित काकडे आणि रामदास काकडे तसेच ह्यूदांई चे पुणे विभागाचे अधिकारी डोंग सिओब ली यांच्या उपस्थितीत जागा हस्तांतरण.
या वेळी आर. एम. के. स्पेसेसचे कार्यकारी संचालक रणजित काकडे आणि रामदास काकडे तसेच ह्यूदांई चे पुणे विभाग अधिकारी डोंग सिओब ली यांच्या उपस्थितीत जागा हस्तांतरण सोहळा पार पडला.आर. एम. के. स्पेसेसचे कार्यकारी संचालक रणजित काकडे यांनी माहिती दिली की, या सर्व कंपन्या एकूण २२६० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यामधून २६४० जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. आरएमके स्पेसेस प्रा. लि. च्या माध्यमातून मंगरूळ, नवलाखउंबरे, बदलवाडी, करंजविहिरे या परिसरात हे कारखाने उभे राहाणार आहेत. येत्या ६ महिन्यांच्या काळात त्यांच्या प्रत्यक्ष उत्पादनास प्रारंभ होणार आहे.
या गुंतवणुकीमुळे भविष्यात नवनवीन उद्योग तळेगाव दाभाडे औद्योगिक क्षेत्राकडे आकर्षित होतील, असा हा परिसर उदयास येत आहे. आंतरराष्ट्रीय दळणवळणाच्या दृष्टीने मुंबईशी असलेली उत्तम रस्त्यांची जोडणी, मुबलक पाण्याची सुविधांमुळे गुंतवणूक होत आहे, या सर्व प्रकल्पांमुळे पुणे जिल्ह्याचा विकास होणार आहे. तळेगाव दाभाडे औद्योगिक क्षेत्रात या कंपन्यांचे आगमन होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे : रणजित काकडे (कार्यकारी संचालक आर. एम. के. स्पेसेस )
आजवर ८६४० जणांना मिळाला रोजगार रत्नागिरीत २९ हजार ५५० कोटींचे प्रकल्प : ह्यूदांई स्टील २६० कोटी, संगवू हायटेक ९७० कोटी, एन्व्हीएच इंडिया १५० कोटी, पीएचए इंडिया १०० कोटी, कोमोस ऑटोमोटिव्ह २०० कोटी, तर डुवन ऑटोमोटिव्ह १०० कोटींची गुंतवणूक करणार आहेत. आर. एम. के. स्पेसेसने या नवीन येणाऱ्या नऊ कंपन्या आणि पूर्वीच्या २४ कंपन्या यांची धरून एकूण या भागामध्ये ६६४० कोटी रुपयांची गुंतवणूक आणली असून ८६४० लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. हांदाई स्टील कंपनी वर्षाला २५० हजार मेट्रिक टन स्टील कार उद्योगासाठी उत्पादन करणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
Nine companies, including South Korea’s Hyundai Steel, are set to invest ₹2260 crore in Pune’s Talegaon Dabhade industrial area, creating 2,640 job opportunities. Hyundai Steel will produce 250,000 metric tons of steel annually for the automotive sector. Along with Hyundai, eight other companies like Sangwoo Hi-Tech, NVH India, and PHA India will establish their plants, marking a significant industrial growth in the region. RMK Spaces has provided 70 acres of land for these projects, which will boost local employment and attract more investments in the future.
Pune industrial investmentHyundai Steel Pune projectJob opportunities in PuneTalawade industrial area companiesForeign direct investment in MaharashtraSouth Korean companies in IndiaHyundai Steel in PuneNew industrial projects Pune
+ There are no comments
Add yours