वडगावशेरीत काँग्रेस कार्यकर्त्यां मध्ये संभ्रम: लोकसभेत काँग्रेस विरोधी भूमिका घेणाऱ्या उमेदवारासाठी मत मागायची कशी?.

1 min read

Confusion Among Congress Workers in Vadgaon Sheri: Decision to Refrain from Supporting Any Candidate!

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB

पुणे: वडगांवशेरी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आहेत.दोन्ही महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचाराला सुद्धा लागलेले असताना विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्ता मात्र द्विधा मनस्थितीत आहेत. लोकसभेत काँग्रेस विरोधी भूमिका घेणाऱ्या उमेदवारासाठी मत मागायची कशी?

स्थानिक काँग्रेस पदाधिकारी जरी महाविकास आघाडी उमेदवाराच्या प्रचारात दिसून येत असले तरी काँग्रेसचा सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्ता प्रचारापासून आलिप्त दिसून येत आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी वडगावशेरीच्या आजी माजी आमदार,नगरसेवक व प्रस्थापित नेत्यांनी भाजपच्या उमेदवाराच्या विजयासाठी जोरदार ताकद लावली होती.लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्ते एकाकी लढा देत होते. ज्या प्रस्थापित उमेदवारांनी लोकसभेला काँग्रेसच्या विरोधात काम केले त्याच उमेदवारांना काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत का पाठिंबा द्यावा असा प्रश्न काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षश्रेष्ठीना विचारत आहेत.

काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी लोकांनी जुळवून घेतले असले तरी सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्ता लोकसभा निवडणूकीतील पराभव अजूनही विसरलेला नाही.

लोकसभेचा पराभव सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अत्यंत जिव्हारी लागलेला आहे.त्यामुळे सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्याने यंदा महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही,आणि कोणत्याही उमेदवाराच्या प्रचारात दिसून येत नाही.

वडगावशेरी मतदारसंघात काँग्रेसला मानणारा मतदार मोठ्या संख्येने असल्याने सर्वसामान्य निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नाराजीचा परिणाम या विधानसभा निवडणुकीत नक्कीच दिसून येणार आहे.

काँग्रेसचे स्थानिक नेते त्यांचे गणिते लक्षात घेऊन प्रचाराला लागले असले तरी सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्ता आज संभ्रमावस्थेत आहे.

सध्यातरी या विधानसभा निवडणुकीत कोणताही झेंडा हाती न घेण्याचा निर्णय काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी घेतलेला दिसून येत आहे.

या संभ्रम आवस्थेत आसलेल्या काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंतांनाची समजूत काढण्यात महा विकास आघाडीला यश येते का? अथवा हे कार्यकर्ते कोणाला जाहीर किंवा छुपा समर्थन देणार हे आगामी काळातच स्पष्ट होईल

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours