मावळचा मावळा सुनील शेळकेच! सर्व विरोधक एकजूट होऊन देखील शेळके यांनी केले पानिपत.

1 min read

सर्व नेते एकत्र येऊनही सुनील शेळके 1,08,565 विक्रमी मतांनी विजयी!

Anil Ghare

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB

मावळ : मावळ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली होती. विरोधकांनी एकत्र येऊन केलेल्या आघाडीला झुगारून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी तब्बल 1,08,565 मतांचे बहुमत मिळवत विरोधकांना धूळ चारली.

सर्व विरोधी नेत्यांची आघाडी अपयशी

मावळ मतदारसंघातील लढाई फक्त एका उमेदवाराविरोधात नव्हती, तर ती सुनील शेळके विरुद्ध सर्व विरोधी नेतेमंडळी अशी झाली होती. महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा जाहीर करत एक नवा पॅटर्न तयार केला होता. मात्र, मावळच्या जनतेने विकासाला पाठिंबा देत विरोधकांचा हा पॅटर्न फसवला असल्याचे दिसले.

महिला मतदारांचा निर्णायक कौल

यंदा महिला मतदारांचा मतदान टक्का लक्षणीय रीत्या वाढल्याचे दिसून आले. राज्य सरकारच्या “लाडकी बहीण” योजनेच्या माध्यमातून महिलांनी आपला कौल शेळके यांना दिला. एकूण 3,86,162 मतदारांपैकी 2,80,319 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, म्हणजेच 72.59% मतदान झाले.

विरोधकांचा वैयक्तिक टीकेचा कार्यक्रम फसला

शेळके यांनी प्रचारादरम्यान विकासकामांवर भर दिला, तर विरोधकांनी केवळ वैयक्तिक टीकांवर वेळ घालवला. मावळच्या जनतेला विरोधकांचा हा दृष्टिकोन पटला नाही. शेवटी, जनतेने उत्स्फूर्तपणे शेळके यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहत, विक्रमी बहुमताने त्यांना विजयी केले.

सुनील शेळके यांची प्रतिक्रिया:

“मावळच्या सर्वसामान्य जनतेचा आणि माता-भगिनींचा खंबीर पाठिंबा हे माझ्या विजयाचे खरे गमक आहे. विरोधक एकत्र आले तरी मावळच्या जनतेने विकासालाच कौल दिला आहे,” असे शेळके यांनी निकालानंतर सांगितले.


You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours