महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा, स्वतः मोहोळ यांनी दिलं स्पष्टीकरण!.

1 min read

खासदारकी वरून थेट मुख्यमंत्री अशी पुन्हा लॉटरी लागणार अश्या पोस्ट वायरल

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB

पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रचंड बहुमत मिळवत इतिहास रचला आहे. भाजपने 132 जागांवर विजय मिळवला, तर इतर मित्रपक्षांनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली.

अशा स्थितीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित झाल्याचे पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट केले आहे. मात्र, शपथविधीच्या तारखेवरून चर्चा सुरू असतानाच अचानक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव नवे मुख्यमंत्री म्हणून सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.

सोशल मीडियावर मोहोळ मुख्यमंत्री होणार?

सोशल मीडियावर अनेक पोस्ट वायरल होताना दिसत आहे, ज्या मध्ये म्हटले की, “खासदारकीवरून थेट मुख्यमंत्री? पुन्हा भाजपची लॉटरी लागणार!”
यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. अमित शहा यांचे विश्वासू मानले जाणारे मोहोळ यांच्यावर पक्षश्रेष्ठींचा खास विश्वास असल्याने त्यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली.

मुरलीधर मोहोळ यांनी चर्चा फेटाळली

या चर्चांवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी म्हटले,”समाजमाध्यमां वरील माझ्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा कपोल कल्पित आहे. आमच्या पक्षात निर्णय पक्षश्रेष्ठी व पार्लमेंट्री बोर्डाद्वारे घेतले जातात. सोशल मीडियावरील चर्चांना पक्षात कोणताही आधार नसतो.”

देवेंद्र फडणवीस यांनाच पक्षश्रेष्ठींचा पाठिंबा

मोहोळ यांनी स्पष्ट केले की, “भाजपने विधानसभा निवडणूक मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच पुढील काळात कामकाज होईल. पक्षाचा निर्णय सर्वोच्च असून, या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये.”.

सोशल मीडियाच्या चर्चांना उत्तर

“महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला भक्कम पाठिंबा दिला आहे. अशा महत्त्वपूर्ण वेळी सोशल मीडियावरील अफवा पसरवणाऱ्यांनी संयम पाळावा,” असे मोहोळ यांनी सांगितले.

Maharashtra CM 2024

Murli Mohol Maharashtra CM rumors

BJP victory Maharashtra

Devendra Fadnavis

CM decision BJP Parliamentary Board


You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours