विशाल संपूर्ण आरोग्य संस्थेच्या १० व्या वर्धापन दिनाचा भव्य उत्सव साजरा..

1 min read

विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणाने कार्यक्रमात भर घातली

Celebrating a Decade of Successful Social Initiatives

Anil Ghare

महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB

मावळ (२४ डिसेंबर २०२४): सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या विशाल संपूर्ण आरोग्य संस्था या प्रेरणादायी संस्थेच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त काकडे फार्म, केशवनगर, वडगाव मावळ येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. टाइम्स ऑफ पुणे आणि आझाद फाउंडेशन यांच्या सहकार्याने झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

संस्थेच्या दशकभराच्या यशस्वी प्रवासाचा गौरव

डिसेंबर १७, २०१४ रोजी डॉ. विशाल गुरव यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली ही संस्था, निःस्वार्थ सामाजिक कार्यासाठी ओळखली जाते.

मागील दहा वर्षांत संस्थेने अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या राबवले:

निःशुल्क योग प्रशिक्षण: विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी.

शैक्षणिक प्रकल्प: आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांसाठी विनामूल्य शिक्षण, संस्कार शिबिरे आणि कौशल्यविकास

संस्कार शिबीर: झोपडपट्टीतील कुटुंबांना आधार देत त्यांचे शैक्षणिक व सामाजिक उन्नती साधणे.

या कार्यक्रमास मावळ तालुक्यातील मान्यवरा सह सामाजिक, राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित महिलांच्या प्रमुख उपस्थीत हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्धाटन आमदार सुनील शेळके यांच्या अर्धांगिनी सौ. सारिका ताई सुनील शेळके (संस्थापिका अध्यक्षा, कुलस्वामिनी महिला मंच) यांच्या हस्ते पार पडले. तसेच सौ. पद्मावती ताई राजेश ढोरे (शहराध्यक्षा, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) सौ. वैशाली ताई पंढरीनाथ ढोरे (कार्याध्यक्षा, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), सौ. धनश्री ताई काकडे, सौ. सारिका ताई विनोदे, सौ. रेश्माताई ढोरे, आणि इतर मान्यवर महिलांच्या उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे ठळक वैशिष्ट्ये:

विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

मान्यवरांचे प्रेरणादायी भाषण आणि सामाजिक कार्याचा गौरव.

संस्थेच्या १० वर्षांच्या कार्याचा आढावा आणि पुढील उद्दिष्टांचा संकल्प.

विशेष आभार प्रदर्शन: संस्थेचे अध्यक्ष डॉ. विशाल गुरव यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी सहकार्य करणाऱ्या दानशूर व्यक्ती, समर्थक, आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

“आमच्या दशकभराच्या प्रवासात मिळालेला पाठिंबा हा आमच्या कार्याचा आत्मा आहे, आणि आम्ही यापुढेही समाजासाठी कार्य करत राहू,” असे ते म्हणाले.

विशाल संपूर्ण आरोग्य संस्थेच्या १० व्या वर्धापन दिनाचा जल्लोष

विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणाने कार्यक्रमाची शोभा वाढवली

दशकभराच्या यशस्वी सामाजिक प्रवासाचा गौरव सोहळा

डॉ. विशाल गुरव यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक बांधिलकीचा आदर्श

Vishal Sapurna Arogya Sanshta celebrated its 10th anniversary with a grand cultural event at Kakade Farm, Keshavnagar, Vadgaon Maval, Pune. Established in 2014 under the leadership of Dr. Vishal Gurav, the institution has made significant contributions to yoga training, education for underprivileged children, and community development. The event featured mesmerizing cultural performances by students, inspiring speeches from dignitaries, and a reflection on the decade-long journey of social commitment.

Grand Celebration of Vishal Complete Health Institution’s 10th Anniversary

Students’ Cultural Performances Add Color to the Event

Celebrating a Decade of Successful Social Initiatives

Dr. Vishal Gurav’s Vision of Social Commitment Honored

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours