पुण्या सह राज्यभरात कायदा आणी सुव्यवस्थेबद्दल खळबळजनक बातम्या येत असतानाच, पुण्यात पोलिसांच्या सतर्कतेचे उदाहरण दिसून आले आहे.
काही दीवसांपूर्वीच गावठी कट्टे पिस्टल बाळगणाऱ्या काहींना यापूर्वी पोलसांनी पकडलेले आहे त्यानंतर काल पुन्हा आणखी एका २० वर्षाच्या मुलाला गावठी पिस्टल सह स्वामी नारायण मंदिराजवळ भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडून गजाआड केले.
यासंदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक ०७/०२/२०२४ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे दैनंदिन कर्तव्य करीत असताना पोलीस अंमलदार चेतन गोरे, निलेश ढमढेरे, महेश बारवकर, निलेश जमदाडे यांना त्यांचे बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, “रेकॉर्डवरील आरोपी राधेमोहन (मुन्ना) सिताराम पिसे, वय २० वर्षे, रा. प्रेमा कॉलनी, लेन नंबर ०२, यशोदिप चौक, वारजे माळवाडी, पुणे हा भुमकर चौकाकडुन स्वामी नारायण मंदीराकडे जाणाऱ्याकडे रोडवर कमरेला पिस्टल लावुन थांबला आहे” अशी बातमी मिळाल्याने लागलीच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी स्वामीनारायण मंदीराचे जवळ जावुन सदर आरोपीचा शोध घेतला असता नमुद आरोपी एक ४०,०००/- रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल व २००/- रुपये किंमतीचे १ जिवंत काडतुस असा एकुण ४०,२००/- रुपयांचे मुद्देमालासह मिळुन आल्याने त्याचेकडुन सदरचा मुद्देमाल जप्त करुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १२६/२०२४, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार , सह आयुक्त प्रविण पवार ,अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील ,पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ स्मार्तना पाटील , सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नंदीनी वग्याणी यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस.पाटील, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार चेतन गोरे, निलेश ढमढेरे, महेश बारवकर, सचिन सरपाले, निलेश जमदाडे, शैलेश साठे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधतु जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.
+ There are no comments
Add yours