डॉ. महीबूब सय्यद यांना विरोधाच्या केंब्रिज युनिवर्सिटी उद्योजकतेसाठी मानद डॉक्टरेट प्रदान!

1 min read

Dr. Mahboob Syed has been awarded an honorary doctorate by the University of Cambridge in America for entrepreneurship!

प्रसिद्ध उद्योजक डॉ. महीबूब सय्यद यांना दुसरे मानद डॉक्टरेट प्रदान….

अहमदाबाद येथे एका प्रतिष्ठित समारोहात प्रख्यात युवा उद्योजक डॉ. महीबूब सय्यद यांना दुसरा मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री श्री. रामदास आठवले, आयएएस उत्पादन शुल्क डॉ. विजय एन. सूर्यवंशी, युरो आशियन युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. सेबॅस्टियन मेंडेस, अमेरिकन कौन्सिलचे शिपिंग आणि चार्टरिंग प्रमुख कॅप्टन डॉ. राजीव मजुमदार, पंडित दीनदयाळ एनर्जी युनिव्हर्सिटी येथे ऊर्जा अभ्यासाचे प्रमुख डॉ. कौशल किशोर, इंद्रशिल युनिव्हर्सिटीचे प्रोव्हॉस्ट डॉ. दारमेश जे. शाह आणि उल्हासनगर जिल्हा चे श्री. महीज शेख हे मान्यवर उपस्थित होते.

विविध क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या मान्यवरांना केंब्रिज डिजिटल यूनिव्हर्सिटी तर्फे मानद / डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली जाते. डॉ. महीबूब सय्यद यांचे माहिती तंत्रज्ञान, विज्ञान, मानव संसाधन, उद्योजकता विकास, मार्केटिंग, रोजगार या सर्व क्षेत्रात भरीव योगदानाची दखल घेत त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली.

डॉ. महीबूब सय्यद यांनी केंब्रिज डिजिटल यूनिव्हर्सिटी तर्फे मिळालेल्या या बहुमाना बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि केंब्रिज डिजिटल युनिव्हर्सिटीचे आभार व्यक्त केले.

डॉ. महीबूब सय्यद यांच्या या यशाबद्दल औद्योगिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कला क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours