इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली नोंद
पिंपरी, पुणे (दि. ३१ डिसेंबर २०२३) वेग वेगळे विक्रम करण्याचा अनेकांचा संकल्प असतो. असे एकामागून एक विक्रम करीत तब्बल १८१ विश्वविक्रम करणारा भारतीय अवलिया आहे दीपक हरके.
अहमदनगर शहरात राहणाऱ्या दीपक हरके यांना असे विश्वविक्रम करण्याचा छंद जडला आहे. यापूर्वी त्यांनी केलेल्या १८१ विक्रमांची नोंद इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे. या अनोख्या आणि वेगवेगळ्या विक्रमामुळे त्यांना फ्रान्स येथील थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सन्माननीय डि. लीट. पदवी प्रदान केली आहे.
डॉ. हरके यांनी रविवारी (दि.३१) पिंपरी चिंचवड येथे त्यांचे भाचे चि. नीरज नवनाथ घोंगडे आणि चि. सौ. का. प्रतिक्षा प्रदीप उडगे यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त १३७५ गुलाबांच्या फुलांचा विश्व विक्रमी गुच्छ भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
नीरज चे आजोबा सुरेश विश्वनाथ हरके यांच्या हस्ते हा विश्व विक्रमी गुच्छ आणि आजी संगीता सुरेश हरके यांच्या हस्ते इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याचे प्रमाणपत्र नव वधू वरांना देण्यात आले. यावेळी संयोजक डॉ. दीपक हरके, नवनाथ घोंगडे, ज्योती घोंगडे, अनिकेत हरके, विहान हरके, सुप्रिया हरके, रमेश कुदरी, सुमित कुदरी, स्वाती कुदरी आदींसह वधू वरांचे नातेवाईक उपस्थित होते.
डॉ. हरके यांच्या संकल्पनेतून अहमद नगर येथील शुभ फ्लॉवर्स अँड डेकोरेटर्स ने हा गुच्छ सहा तासात बनविला आहे
.
+ There are no comments
Add yours