विश्वविक्रम प्रस्थापित करणाऱ्या उधोजकाने अजित पवारांच्या उपस्थित केला राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश…..

1 min read

टॅलेंट कॉर्प सोल्युशन चे डायरेक्टर आणि कौशल्य विकास क्षेत्रात विश्व विक्रम प्रस्थापित करणारे युवा उधोजक डॉ. महेबूब सय्यद यांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत मोशी येथे भव्य कार्यक्रमात पक्ष प्रवेश केला.

डॉ. महेबूब सय्यद यांनी सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राभवून रोजगार, कौशल्य विकास, शैक्षणिक, शेती क्षेत्रात भरीव योगदान दिले आहेत.

रोजगार क्षेत्रात टॅलेंट कॉर्प सोल्युशनच्या माध्यमातून 15 हजार पेक्षा अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून वेगळी ओळख निर्माण केली, तसेच नवं उधोजकांना मार्गदर्शन व व्यवसायिक संधी उपलब्ध करून दिली.

डॉ. महेबूब सय्यद हे अनेक सामाजिक संघटनाच्या राष्ट्रीय आणि राज्य कार्यकरणीवर महत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत.

त्यांच्या या कामगिरीचे कौतुक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्थरावर अनेक दिगग्ज संस्थेतर्फे करण्यात आली आहे.

त्यांच्या कार्याची दखल घेत उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस रोजगार व स्वयं रोजगार विभागाच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.

दरम्यान अजित दादा पवार यांच्या विकासाच्या कार्यशैली वर प्रभावित होऊन महाराष्ट्रात रोजगार आणि स्वरोजगार क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी दादांचे नेतृत्वात काम करण्याची संधी मिळत असल्याने या संधीचे नक्किच सोने करण्यात येईल अशी प्रतिक्रिया या वेळी डॉ. महेबूब सय्यद यानी व्यक्त केली

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस रोजगार व स्वयं रोजगार विभागाच्या प्रदेश अध्यक्ष मेघा पवार,माजी राज्यमंत्री ज्ञानेश्वर कांबळे, बॉलिवूड अभिनेता गुरमीत सिंग, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अजित गव्हाणे हे उपस्थित होते

कोण आहे डॉ. महेबूब सय्यद
लोणी काळभोर या पुण्या जवळील भागातील सामान्य कुटुंबातील ध्येयवादी तरुण…
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत इंजिनिअरिंग चे शिक्षण पूर्ण केले,
सुशिक्षित तरुणांना उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरी मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष
पाहून निश्चय केला की स्वतः नोकरी न करता सुशिक्षित तरुणांना नोकरी मिळवण्यासाठी व्यसपीठ निर्माण करायचे आणि येथूनच सुरू झाला टॅलेंट कॉर्प सोल्युशनचा प्रवास….

शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना मार्केट सर्व्हे करून नोकरी पूरक प्रशिक्षण देणे सुरू केले ज्या मुळे बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळणे सुरू या दरम्यान व्यवसायात आणि पारिवारिक जीवनात अनेक चढ उतरणांना न खचता समर्थपणे तोंड दिले.

टॅलेंट कॉर्प सोल्युशन ह्यूमन रिसोर्स सोल्युशन,स्टाफिंग, पे रोल, स्किल डेवलोपमेंट, प्रोफेशनल कोर्सेस, सी एस आर सोल्युशन अश्या सेवा नामांकित कंपन्यांना सेवा देत आहेत.

आज रोजी टॅलेंट कॉर्प सोल्युशन तर्फे विविध कंपन्यांन मध्ये 15 हजार पेक्षा अधिक तरुणांना
रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

Erat Pede

Laoreet Consectetuer

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours