Traffic diversion: Construction of Sadhu Vaswani Bridge is underway, this is an alternative route
पुण्यातील येरवडा – कॅम्प भागाला जोडणारा, सेंट मीरा कोलेज समोरील साधू वासवानी पूल धोकादायक असल्याचे निरीक्षण समोर आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नव्याने बांधण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
त्यामुळे बुधवारपासून कोरेगाव पार्क भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
या भागातील वाहतूक बदल पुढीलप्रमाणे :
येरवड्यातील पर्णकुटी चौक ते ब्ल्यू डायमंड चौक ते मोबोज चौक हा मार्ग एकेरी करण्यात येणार आहे. मोबोज चौक ते महात्मा गांधी उद्यान चौक (बंडगार्डन रस्ता) एकेरी मार्ग करण्यात येणार आहे. अलंकार चौक ते आयबी चौक ते सर्किट हाऊस चौक ते मोरओढा चौक मार्ग एकेरी करण्यात येणार आहे.
मोरओढा चौक ते कौन्सिल हॉल चौक एकेरी मार्ग करण्यात येणार आहे.
या मार्गावर जड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवेतील वाहनांना मुभा देण्यात आली आहे.
काहून रोड जंक्शन ते तारापूर रोड जंक्शन रस्ता पूर्वीप्रमाणेच एकेरी राहणार आहे.
कौन्सिल हॉल चौक ते साधू वासवानी पुतळा मार्ग एकेरी करण्यात येणार आहे.
असा आहे पर्यायी मार्ग
नगर रस्त्यावरून मोरओढा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी पर्णकुटी चौक, महात्मा गांधी चौक, ब्ल्यू डायमंड चौकातून उजवीकडे वळावे. तेथून मोबोज चौक, मंगलदास चौकीकडून पुन्हा डावीकडे वळावे. रेसिडेन्सी क्लब चौकातून सर्किट हाऊसमार्गे मोरओढा चौकाकडे जावे.
मोरओढा चौकातून कोरेगाव पार्क चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी कौन्सिल हॉल चौक, मंगलदास चौक, बंडगार्डन रस्ता, महात्मा गांधी उद्यान चौकातून उजवीकडे वळून कोरेगाव पार्ककडे जावे.
पुणे स्टेशनहून कोरेगाव पार्ककडे जाणाऱ्या वाहनांनी अलंकार चौक, कौन्सिल हॉल चौक, मंगलदास चौक, बंडगार्डन रस्ता उजवीकडे वळून कोरेगाव पार्ककडे जावे.
पुणे स्टेशनकडून घोरपडी गावाकडे जाणाऱ्या वाहनांनी अलंकार चौक, आयबी चौक, सर्किट हाऊस चौकमार्गे मोरओढा चौकात जावे. तेथून इच्छितस्थळी जावे.
आयबी चौक ते मोरओढा चौक एकेरी मार्ग तात्पुरता दुहेरी करण्यात येणार आहे. ब्ल्यू डायमंड चौक ते कोरेगाव पार्क परिसरातील साऊथ मेन रस्त्यावरील वाहतूक पूर्वीप्रमाणेच राहणार आहे, असेही मगर म्हणाले.
+ There are no comments
Add yours