एकीकडे पुण्यात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात दिवसोंदिवस वाढ होत असताना, पोलीस खाते देखील अँक्शन मोड मध्ये असल्याचे दिसून येत आहे.
त्याचाच भाग म्हणुन रेकॉर्ड वरील गुंड, फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी खाकी सज्ज झाल्याची दिसत आहे.
अशीच माहिती समोर आली आहे की, सराईत गुंड आखील ऊर्फ ब्रिटीश पालांडे व अमित टिंगरे यांचे सह गुन्हेगारी करणाऱ्या मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीस
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या नेत्तृत्वाखाली युनिट-४ कडून बेड्या ठोकण्यात आल्या.
मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी आयुष अनिल जाधव वय 19 वर्षे रा. इंगळे हाईटस, नादब्रह्म होटेल जवळ, उत्तम नगर पुणे यास अटक करण्यात आली.
येरवडा पोलीस स्टेशन मध्ये गुरनं. 623/2023 भा.द.वि. कलम 394, 385,323, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा क. 3(1), 3(2), 3(4) अश्या कलमा अंतर्गत गुन्ह्याची नोंद असलेल्या फरार आरोपीबाबत पोलिस नाईक नागेशसिंग कुंवर यांना गोपनीय माहिती मिळाली मिळाली
आणि आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सापळा रचून संबंधित गुन्हेगारांना अटक करण्यात आली.
सदरची कारवाई रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त पुणे, अमोल झेंडे पोलीस उप आयुक्त गुन्हे, सतीश गोवेकर सहा क य्यक पोलीस आयुक्त गुन्हे -2, सोमनाथ जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट 04 यांचे मार्गदर्शनाखाली API विकास जाधव, PSI जयदीप पाटील, पोलीस हवा. हरीश मोरे, संजय आढारी, सारस साळवी, विठ्ठल वाव्हळ, प्रवीण भालचिम, अजय गायकवाड, अमोल वाडकर, स्वप्निल कांबळे, विनोद महाजन, वैभव रणपिसे यांनी केली आहे.
+ There are no comments
Add yours