रत्नागिरी येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थतीत महीला दिना निम्मित: महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन.

1 min read

In the presence of Industries Minister Uday Samant at Ratnagiri Women’s Day Nimmit: Maharashtra Book of Records State Level Awards.

महाराष्ट्रातील प्रतिभावंत आणि कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करणारी नावाजलेली संस्था महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे जागतिक महिला दिननिमित्त हर घर रोजगार व टाइम्स ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याचे पालक मंत्री उदय जी सामंत यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये रत्नागिरी शहरात भव्य दिव्य असा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा दिनांक 3 मार्च रोजी, दुपारी 3 वाजता, स्वामी समर्थ मंगल कार्यालय, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील कला, क्रीडा, औद्योगिक, शैक्षणिक, अध्यात्मिक,राजकीय, सामाजिक, या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रतिभावंत महिलांचा महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे “वूमन अचिवर्स अवॉर्ड” या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स ही एक अशी संस्था आहे ज्याचा उद्देश आपल्या राज्याच्या विविध क्षेत्रात समृद्धी, भरभराटी, तसेच अभिमानास्पद  व उल्लेखनीय  कामगिरी करणाऱ्या असामान्य व्यक्तींचा गौरव, कौतुक आणि सन्मान करणे हा आहे, जेणे करून अश्या व्यक्तिंना उर्जा मिळावी व आणखी जोमाने उत्कृष्ट कार्य करण्यास बळ प्राप्त व्हावे.  

हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा रत्नागिरी शहरात आयोजीत करण्यासाठी  श्री किरण जी सामंत, उद्योजक तथा सदस्य – सिंधुरत्न समृद्ध योजना, महाराष्ट्र शासन, उपाध्यक्ष – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या विशेष सहकार्याने होत आहे.

या कार्यक्रमास आय पी एस अधिकारी एम देवेंद्र सिंग, रत्नागिरी जिल्हा अधिकारी, अप्पर पोलीस अधिक्षक, जयश्री गायकवाड, महारष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डचे अध्यक्ष आदम सय्यद, सेक्रेटरी स्नेहा कुलकर्णी, कार्याध्यक्ष महेबुब सय्यद, उपाध्यक्ष सतीश राठोड, तसेच टाईम्स ऑफ पुणे चे पत्रकार लकी साळुंके, पत्रकार येवले यांच्या उपस्थितीत होणार आहे.

दरम्यान या कार्यक्रमात दिमागदार, कला, मनोरंजन आणि संस्कृतिक मेजवानीने भरपूर असे कार्यक्रम तसेच उपस्थित प्रेक्षकांसाठी आकर्षक भेट वस्तूंचा लकी ड्रा देखील असणार आहे.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours