पवना परिसरात भूमिपुत्रांच्या जमिनी परप्रांतीयांच्या घश्यात टाकण्याचे डाव…

1 min read

निसर्गाची खाण समजली जाणारी पुण्यातील मावळ भूमीतील पवना धरण परिसरात पैसा आणि मनगटशाही च्या जोरावर भूमिपुत्रांकच्या जमिनी धन दांडग्या परप्रांतीयांच्या घश्यात टाकण्याचा गंभीर प्रकार सुरू आहे. पिढ्यानपिढ्या ज्या शेतकऱ्यांनी जमिनी कसल्या अश्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर काही परप्रांतीय पैश्याच्या जोरावर स्थानिक गुंडांना हाताशी धरून जमीनीवर कब्जा व  बेकायदेशीर बांधकाम तेही कायद्याची पायमल्ली करून करत असल्याचा आरोप पीडित शेतकरी करत आहे.

शासन दरबारी तीन पिढ्या आमच्या नावे सात – बरा आहे, आम्हाला कोणतीच खबर न देता तसेच ग्रामपंचायतीचा कोणताही परवाना न घेता त्या जागेवर परस्पर बांधकाम केले जात आहे असल्याचे हे यावेळी पीडित शेतकऱ्याने नमूद केले.

या बाबत अधिक माहिती अशी की, चंद्रकांत गायकवाड राहणार पाले(पवना, मावळ) , यांच्या वडिलोपर्जीत जमिनीवर पाले येथील गट क्रमांक ९७ येथे काही भू माफियांनी, परप्रांतीयांच्या पैश्याच्या जोरावर कब्जा करून त्या ठिकाणी भाडोत्री गुंड ठेवले आहेत, गायकवाड हे स्वतःच्या जागेवर गेले असता ते गुंड त्यांना त्या जागेत येऊ देत नाहीत, तसेच त्यांना जीवे मारण्याची धमक्या दिल्या जात आहेत.

पोलिसानंकडे न्याय मागवयास गेल्यास पोलीस देखिल तक्रार दाखल करून घेत नाहीत, प्रशासकीय अधिकारी देखील “अर्थ” पूर्ण दबावाला बळी पडल्याचा आरोप त्यांनी केला.

मुळात पवना परिसरात फोफावत चालेल्या भू माफियांच्या या गुंडाराज ला अळा बसणार की नाही? तरी हतबल झालेला हवालदिल भूमीपुत्र आपल्या हक्का साठी  झुंज देताना दिसत आहे…

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours