शिवकालीन मर्दानी स्पर्धेत २८५ बैठका मारून सौरभ नामदेव ढोरे  यांनी रचला नवा विक्रम…

1 min read

शिवकालीन खेळांचा इतिहास जिवंत रहावा या हेतूने सालाबादप्रमाणे पारंपारिक अश्या शिवकालीन मर्दानी स्पर्धेचे वडगाव मावळ येथे आयोजन..

वडगाव मावळ दि: २५ मार्च २०२४ रोजी होळी व धुलीवंदन सणानिमित्त जय बजरंग तालीम मंडळ ट्रस्ट तर्फे शिवकालीन खेळांचा इतिहास जिवंत रहावा या हेतूने सालाबादप्रमाणे पारंपारिक अश्या शिवकालीन मर्दानी स्पर्धेचे आयोजन केले होते ज्या मध्ये सौरभ नामदेव ढोरे या तरुणाने चक्क २८५ बैठका तेही भली मोठी दगडी गोटी खांद्यावर घेऊन मारले आणि नवा विक्रम रचला.

या वेळी सौरभला स्व. पै केशवराव ढोरे यांच्या स्मरणार्थ वस्ताद श्री उमेश ढोरे यांच्या वतीने चांदीची गदा देण्यात आली. तसेच नगराध्यक्ष मयुर ढोरे माजी उपनगरध्यक्षा सायली ताई म्हाळसकर यांच्यावतीने बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

दरम्यान आमदार सुनील आण्णा शेळके यांनी शिवकालीन मर्दानी खेळाचा प्रसार आणि प्रचार केल्या बद्दल आयोजकांचे आभार मानले, तसेच सर्व विजेते आणि स्पर्धकांचे अभिनंदन केले.

गुण तालिका पुढील प्रमाणे

मोठा गट (वरिष्ठ )

सौरभ ढोरे २८५ बैठका

किशोर धोत्रे २१२ बैठका 

तेजेस भिलारे ६६ बैठका 

नितीन म्हाळसकर ३५ बैठका 

अभिजीत दिसले ३५ बैठका .

चिराग वाघवले २६ बैठका 

या गटातील (वरिष्ठ गट )  विजेत्यांला अरुण वाघमारे, सुनील दंडेल, व अतुल ढोरे यांच्या वतीने चषक देऊन सन्मान करण्यात आला.

 लहान गट (कनिष्ठ गट )

विराज वाघवले ११८ बैठका

हर्ष चव्हाण ८० बैठका

यशराज चव्हाण ८० बैठका 

आर्यन  ढोरे ५१ बैठका .

दवेश पाटील ३३ बैठका

साक्षी म्हाळसकर २८ बैठका

प्रथमेश नवघणे १७ बैठका 

मयुरी लोळे ७ बैठका 

लहान  गटातील ( कनिष्ठ गट )

या गटातील विजेत्यास विकी म्हाळसकर, अशोक घुले,सागर बरदाडे, यांच्या तर्फे चषक देऊन सन्मानित करण्यात आले

वडगाव मावळचे ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात सोमवारी सकाळी ९:०० वाजता शिवप्रतिमेची पूजा करून मानाची दगडी गोटी पुजन ग्रामदैवत पोटोबा महाराज देवस्थानचे उपाध्यक्ष श्री गणेश आप्पा ढोरे, विश्वस्त चंद्रकांत ढोरे, अनंता कुडे, गणेश विनोदे, किरण भिलारे, अमोल भोईरकर, बिहारीलाल दुबे, सुधीर म्हाळसकर, सुनिल चव्हाण  वस्ताद उमेश ढोरे यांच्या हस्ते पार पडले.

या वेळी बाबुराव आप्पा वायकर,  पंढरीनाथ ढोरे,   भास्करराव म्हाळसकर, सुधाकर ढोरे, बापूसाहेब वाघवले,विलास दंडेल, अर्जुन ढोरे, बाळासाहेब तुमकर,खंडू भिलारे, रविद्र काकडे, किरण म्हाळसकर, दिनेश ढोरे,आतिश ढोरे, दिलीप चव्हाण, राजेंद्र वहिले,शिवाजी असवले, प्रविण ढोरे यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी कुस्ती क्षेत्रात मावळ तालुक्याचे नावलौकिक करणारे, स्व.पै केशवराव ढोरे यांच्या स्मरणार्थ प्रतिभावंत पैलवानांना क्रिडा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

ज्या माध्ये पै.खंडू वाळुंज, पै.विकास यनपुरे, पै.अमोल राक्षे,  पै. खंडू कालेकर, पै. भरत लिम्हण, पै.विपुल आडकर, पै. तुषार येवले, पै. प्रतिक देशमुख, पै. सावरी सातकर, पै.अजित करवंदे, पै.संदीप काळे, पै.नागेश राक्षे, पै.सनम शेख यांचा सन्मान करण्यात आला.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours