अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न : भडगाव पोलिसांनी केली पोलखोल.
सतीश राठोड (ब्युरो चीफ).
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या प्रियसी च्या पतीला प्रियकर राजेंद्र शेळके महाराज याच्या मदतीने पैसे देण्याचा बहाणा करून पळासखेडे रस्त्यावर अपघाताचा बनाव करून खून केल्याची घटना ३१ मार्च रोजी मध्यरात्री २ वाजता समोर आले आहे.
यात आरोपी पत्नीला आणि फरार झालेल्या प्रियकर राजेंद्र शेळके महाराज रा. आळंदी पुणे याला वाहनासह भडगाव पोलीसांनी अटक केली आहे. दोघांवर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, याबाबत अधिक असे की, भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथे मृत किशोर पाटील हे आपल्या पत्नी पुष्पा पाटील हिच्या सोबत वास्तव्याला होते. दरम्यान किशोरच्या पत्नीचे राजेंद्र शेळके महाराज रा. आळंदी जि.पुणे यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. यामुळे अनेक वेळा या कारणावरून किशोर पाटील आणि पत्नी पुष्पा पाटील यांच्यात वाद होत होते.
दरम्यान, अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्याचे पत्नी पुष्पा पाटील हिने ठरविले. त्यानुसार प्रियकर राजेंद्र शेळके महाराज याच्या मदतीने नियोजन केले. यात प्रियकर राजेंद्र शेळके याने पैसे देण्याचा बहाणा करून किशोर पाटील याला पळासखेडे ते तरवाडे रोडवर बोलावून घेतले. त्यानुसार किशोर पाटील हा शनिवार ३० मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता घरातून निघून गेला. त्यानुसार आगोदरच दबा धरून बसलेले राजेंद शेळके यांने अपघाताचा बनाव करून किशोर पाटील याला ठार केले. हा प्रकार रविवारी ३१ मार्च रोजी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आला होता.
याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मयताची पत्नी पुष्पा पाटील हीला पोलीसांनी अटक केली होती. तर मारेकरी राजेंद्र शेळके महाराज याला वाहन क्रमांक (एमएच १२ एमएस ००१०) सह अटक केली आहे.
+ There are no comments
Add yours