कडक उन्हाळयात सहा वर्षाच्या चिमुकल्या मोहम्मद साद याने केले रमजान चे 30 रोजे पूर्ण…

1 min read

विमानतळ परिसरातील, इंदिरा नगर, ब्रमाशेल या भागातील सिनियर केजी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अवघ्या सहा वर्षाच्या मोहम्मद साद समीर शेख या चिमुकल्याने संपूर्ण महिनाभराचे उपवास केले.

मुस्लिम धर्मात रमजान हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो,या काळात संपूर्ण मुस्लिम समाज भक्तीमय वातावरणात ईश्वराची प्रार्थना करत असतो.

याच महिन्यात निर्जल असे उपवास केले जाते ज्या मध्ये सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंब देखील न घेता कडक उपवास केले जाते.

विमानतळ परिसरातील, इंदिरा नगर, ब्रमाशेल या भागातील सिनियर केजी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अवघ्या सहा वर्षाच्या मोहम्मद साद समीर शेख या चिमुकल्याने 

संपूर्ण महिनाभराचे उपवास केले, विशेष म्हणजे या काळात त्याने एक दिवस देखील शाळेला किंवा ट्युशनला दांडी मारली नाही, यंदा रमजान कडक उन्हाळयात आल्याने उन्हाचा पारा 40 डिग्रीच्या पुढे गेला होता अश्या कडक उन्हाळात देखील ईश्वराच्या भक्तीत तल्लीन होऊन खडतर उपवास देखील सहज पूर्ण केले.

मोहम्मद साद याने रमजान महिन्यात केवळ रोजाच ठेवले नाही तर त्याने नियमित नमाज देखील अदा केले, दररोज किमान चौदा तासाहून अधिक काळ उपवास करून अद्भुत इबादत (भक्ती) केली. लहान वयातच त्याने दाखवलेली ही  निष्ठा आणि कठोर परिश्रम प्रेरणादायी आहेत.

साद याचे वडील, समीर शेख, संजय पार्कमध्ये “फिरोज स्क्रॅप” नावाने असलेला स्क्रॅपचा व्यवसाय चालवतात. साद यांच्या या कठोर उपासनेची बातमी समाजात पसरत आहे आणि त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours