प्रतिनिधी: अनिल घारे, मावळ.
बुधवार दिनांक १७ / ०४ / २०२४ रोजी रामनवमी उत्सव निमित्त मावळ तालुक्यातील धानगव्हाण येथील श्रीराम मंदिरात रामनवमीनिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली मंदिरात रामनवमीनिमित्त हरीजागर प्रवचन किर्तन तीन ते चार दिवस सलग अखंड हरिनाम सप्ताह महाआरती प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
सकाळी श्रीची महापूजा व अभिषेक करण्यात आला श्रीराम जन्मोत्सव निमित्त मंदिरात भजन कीर्तनाचा भाविकांनी आनंद लुटला व महाप्रसाद भंडारा करण्यात आला.
यावेळी करंजूआई देवी चा छबिना व पालखी ढोल ताशाच्या गजरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली
त्यानिमित्त ढोल ताशा मिरवणूक काढून ,ओझर्डे गावातील सुप्रसिद्ध असे महाराष्ट्रातील गाजलेले रंगीत संगीत भारुडाचा कार्यक्रम मोठ्या संख्येने श्रीरामनवमी यात्रेचा उत्सव आनंदात जल्लोशात सर्व ग्रामस्थांनी साजरा करण्यात आला
+ There are no comments
Add yours