प्रतिनिधी: लकी साळुंके, पुणे
चिंचवड : वाल्हेकर वाडी येथील सर्वे क्रमांक ८० मधील हिस्सा क्रमांक २/३/४/१/३ ही २२.५ गुंठे या जागेचा ताबा सोडून द्या ,अन्यथा तुमचा कार्यक्रम करू अशी धमकी विवेक जैन, रमनिक लाल जैन ,आणि अभय मांढरे यांनी जागामालकांना दिली असल्याची तक्रार पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त यांच्याकडे केली असल्याचे जागेचे मालक सुहास भेगडे राहणार वाल्हेकर वाडी चिंचवड यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
या वेळी त्यांनी अर्जद्वारे असा उल्लेख केला आहे की मी स्वतः वाल्हेकरवाडी येथील तत्कालीन जागामालक बिपिन संघवी यांच्याकडून सर्वे क्रमांक ८० हिस्सा क्रमांक २/३/४/१/३/ ही २२.५ आर ही जागा नोंदणीकृत खरेदी खात्याने विकत घेतली असून खरेदी बाबत १२२३०/२०२३ रोजी सब रजिस्टर हवेली क्रमांक २२ यांच्यासमोर कायदेशीर नोंद केली आहे. तिथून ९ जून २०२३ पासून सदरील जागेवर आज तागायत आमचा ताबा आणि वहिवाट सुरू आहे सतत सदरील जागेवर दावा करणारे रमनिक लाल जैन, विवेक जैन, यांनी मला अभय मांढरे यांच्यामार्फत सदर जागेचा ताबा तात्काळ सोडण्याचे सुचवले असून ताबा न सोडल्यास पोलीस आयुक्त व इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने आमच्यावर गंभीर गुन्हे दाखल व खोटे गुन्हे टाकण्याचे त्यामुळे आम्ही तुमच्या जागेवर ताबा कधीही मिळू शकतो अशा प्रकारची धमकी दिल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड व शहर पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दिली असल्याची माहिती सुहास भेगडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे .खरं सांगायचं तर याबाबतच्या बऱ्याच तक्रारी जमिनीबाबत ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दाखल झाल्या होत्या, तसेच आजपर्यंत त्यांना धमक्यांचे फोन येत आहेत जर ती आम्ही जागा नाही दिली तर तुमचा कार्यक्रम करू अशी जीवे मारण्याची धमकी दिली असून तुरुंगातून गंभीर गुन्ह्यातून बाहेर आलेले अनेक गावगुंड आमच्या संपर्कात आहेत ,त्यांच्यामार्फत आम्ही ती जागा कधीही मिळू शकतो आणि तुमची वाट लावू शकतो, अशा भाषेत ही धमकी दिली जात आहे .
सदर बाबींमुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला असून चिंचवड परिसरात अशा प्रकारच्या जमिनी च्या वादातून गंभीर गुन्हे असल्याच्या घटना आहेत. त्यामुळे माजी यांच्याविरुद्ध तक्रार आहे वरती दिलेल्या तक्रारीची नोंद घ्यावी व प्रतिबंधात्मक उपायोजना व त्यांच्याविरोधात कारवाई करावी अशी विनंती जागा मालकाने मा. पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर यांना दिली आहे..
+ There are no comments
Add yours