कार्ला येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात 15 जोडपी विवाहबद्ध …..

1 min read

मागील बारा वर्षांपासून कार्ला  संस्थे तर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

प्रतिनिधी : अनिल घारे, मावळ.

लोणावळा कार्ला  येथे झालेला सामुदायिक विवाह सोहळा पार पडला यामध्ये जोडपी 15 विवाहबद्ध झाली शेकडो वऱ्हाडीनी दिले अक्षतारूपी आशीर्वाद सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात सकाळी साखरपुड्यांनी झाली 

यावेळी माजी सभापती विठ्ठल शिंदे ज्ञानेश्वर शिंदे नारायण ठाकर अलका धानिवले हे उपस्थित होते.

हळदीचा कार्यक्रम नवरदेवाची मिरवणुक ढोल ताशांचा गजरात मिरवणूक काढण्यात आली

या विवाह सोहळ्यात लग्न करणाऱ्या प्रत्येक वधूस एक तोळा सोन्याचे मंगळसूत्र कानातले कर्णफुले पायातील पैजन जोडवी नथनी व कन्यादान संसार उपयोगी भांडी शिलाई मशीन देण्यात आली साखरपुड्याला व हळदीला लागणाऱ्या साड्या लग्नातला लागणारा वर राजाचा लग्नाचा सूट व वधू साठी शालू 15 व प्रत्येक वरांना वधूंना मनगटी घड्याळ संसार उपयोगी वस्तू देण्यात आल्या.

प्रमुख उपस्थिती म्हणून विवाह समारंभास मावळचे जनसेवक आमदार  सुनील आण्णा शेळके,गरुड झेप अकॅडमीचे डॉक्टर श्री सुरेशजी सोनवणे, युवा सेना पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री विश्वजीत बारणे, मावळ भूषण ह भ प तुषार महाराज दळवी, शरद पवार गटाचे अध्यक्ष दत्तात्रय अण्णा पडवळ,शरद हूलावळे,शिवसेना नेते मच्छिंद्र खराडे, दिपालीताई हुलावळे, बाबुराव आप्पा वायकर, गुलाबराव म्हाळसकर, अशिष  ठोंबरे, शिवाजी असवले, परिसरातील सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य  यांची उपस्थिती होती.

कार्ला  संस्थेचे विवाह सोहळ्याचे बारावे वर्षे आहे त्यावेळी सोहळ्याच्या आयोजन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब येवले कार्याध्यक्ष राजू देवकर उपाध्यक्ष अमोल हूलावडे संस्थापक भाई भरत मोरे  जितेंद्र भाऊ बोत्रे दीपक हुलावळे किरण भाऊ हुलावळे सुरेश गायकवाड संजय देवकर इतर पदाधिकारी कार्ला परिसरातील ग्रामस्थ आदींनी केले होते.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours