प्रतीनिधी : सतीश राठोड, टाईम्स ऑफ पुणे
मीरा-भाईंदर कमिशनरेट येथील भरोसा सेलच्या अध्यक्षा एपीआय / सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री रोहिदास शिंदे यांना महाराष्ट्र पोलीस खात्यातील सर्वोच्च मानाचे पोलीस महासंचालक पदक (D. G. Insignia) प्रदान करण्यात आले आहे. अल्प कालावधी मध्येच आपल्या लोकाभिमुक व महिलाकेंद्री कार्यामुळे एपीआय तेजश्री शिंदे यांनी मीरा-भाईंदर पोलीस कमिशनरेट मध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.
बाल-लैंगिक अत्याचार व त्याबाबतच्या कायद्याची जनजागृती करण्यासाठी आसपास च्या शाळा व सामाजिक संस्थामध्ये जाऊन त्यांनी शेकडो प्रबोधनाचे व जन-जागृतीचे कार्यक्रम केलेले आहेत. त्यांच्या या अद्वितीय कार्यासाठी त्यांना युनिसेफ व महाराष्ट्र राज्य शासनाचा पहिला बलस्नेही पुरस्कार यापूर्वीच प्रदान करण्यात आलेला आहे. मीरा-भाईंदर परिसरात “पोलीस दीदी” या नावाने त्या जनतेमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कार्यामुळे मीरा-भाईंदर पोलिस खात्याची एक वेगळी व सकारात्मक प्रतिमा समाजामध्ये निर्माण झाली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना यावर्षीचा सर्वोच्च मानाचा पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आलेले आहे.
एपीआय तेजश्री शिंदे यांचे कार्य समाजातील व महाराष्ट्र पोलिस खात्यातील महिलांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कार्य कर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना प्राप्त झालेल्या पोलीस महासंचालक पदामुळे त्यांचे वडील व आई श्री. रोहिदास शिंदे व पुष्पा शिंदे यांनी आनंद व संतोष व्यक्त केला आहे.
+ There are no comments
Add yours