अनिल घारे : मावळ प्रतिनिधी.
टाकवे बुद्रुक ताः १८ बेलज येथील शेतकरी सुभाष ओव्हाळ व त्यांच्या दोन्ही बंधूंनी मागील वर्षी पॉलिहाऊस बांधले होते ह्या पॉलिहाऊस साठी लागणारा खर्च 25 लाख रुपये इतका आला होता त्यासाठी त्यांनी काबाड कष्ट करून साठवून ठेवलेली पुंजी त्यांचे नातलग मित्र परिवार असे हात उसने पैसे घेऊन घरातले डाग दागिने मोडून सर्व पैसे त्यांनी जमा करून 25 गुंठ्यामध्ये पॉलिहाऊस उभे केले होते मात्र जोरदार वादळी वाऱ्यामुळे अवकाळी पावसाने पॉलीहाऊस पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे त्यांच्या कुटुंबाला रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे या शेतकरी कुटुंबावर ती एक प्रकारचे संकट उभे राहिले आहे
राजपुरी गावामध्ये अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे घरावरचे पत्रे उडून गेले गावातील रहिवासी संदीप लोंढे यांच्या नवीन पोल्ट्री चे काम पूर्ण होत आले होते पण पोल्ट्री चे संपूर्ण पत्रे तुटले लोखंडी चैनलही वाकडेतिकडे झाले
अंदर मावळातील अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नाने मावळ शेतकऱ्यांचे नुकसान हे मोठ्या प्रमाणात झाले आहे त्यामध्ये गहू कांदा ज्वारी बाजरी आंबा शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास हा हिरावून घेतला आहे शेतकरी चिंतेत पडला आहे
मावळमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहेपंचनामे पूर्ण , नुकसान भरपाईची मागणी त्यात पॉलिहाऊसचा ही सामावेश अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी व अधिकारी यांनी घटनास्थळी पाहणी केली असून पंचनामे केले आहेत झालेल्या नुकसानीचे प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे शासन नियमाप्रमाणे मदतीची कार्यवाही करण्यात येत आहे अशी माहिती टाईम्स ऑफ पुणे ला मावळ चे तहसीलदार विक्रम देशमूख यांनी दिली.
+ There are no comments
Add yours