ब्रम्हा बिल्डर प्रकरण: कुणाला पैश्यांची खूप मस्ती आली असेल तर ती जिरवायची ताकद आम्हा पुणेकरांमध्ये आहे : आ. रवींद्र धंगेकर

1 min read

ड्रग्स, पब आणि भ्रष्ट पोलिसांन विरोधात धंगेकर आक्रमक

ब्रम्हा बिल्डर चे मालक विशाल अगरवाल याच्या मंदधुंध असलेल्या वेदांत अगरवाल या मुलाने पब मध्ये हुल्लडबाजी केल्या नंतर स्पोर्ट कार भरघाव वेगाने मुंडवा ते कल्याणी नगर या भागात बेजबाबदार रित्या चालवली आणि दोन निष्पाप तरुणांचा जीव घेतला.

विशेष म्हणजे ज्या वेगाने गाडी चालवत वेदांत अगरवाल ने दोघांचा जीव घेतला त्याच्या दुप्पट वेगाने, भ्रष्ट व्यवस्थेच्या ला पैश्याच्या तालावर नाचवत त्याचा जामीन झाला. याची प्रचंड चीड सामान्य पुणेकरांच्या मनात निर्माण झाली

दोन तरुणांचा जीव घेणाऱ्या या मुलास एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्ट प्रमाणे पोलीस आणि संपूर्ण यंत्रणा पैश्या पुढे झुकलेली दिसली..

या वर कोर्टाने ही अजब फरमान बजावले, दोन बळी घेणारा मुलगा अल्पवयीन असल्यानं जामीन देताना अटी अशा:

पंधरा दिवस वाहतूक नियोजन करावं

वाहतूक जागृतीचे फलक रंगवावेत 

अपघाताबद्दल तीनशे शब्दांचा निबंध लिहावा

विशेष म्हणजे पोलीसांनी तक्रार घेताना सामान्य कलमे लावली, आरोपी दारू पिलेला होते हे प्रत्यक्षदर्शी सांगत होते, त्याचा दारू पितानाचा सीसीटीवी फुटेज देखील असताना पोलीसांनी आरोपीची पाठराखण करत तात्काळ अल्कोहोल चाचणी केली नाही, उशिरा चाचणी केल्याने अल्कोहोल रिपोर्ट निगेटिव्ह आले, आरोपीला पोलीस स्टेशन मध्ये पिझ्झा,बर्गर पुरवण्यात आले.

कल्याणीनगर मधील घटनेत कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणजे परत कोणी पैश्यावाल्याची औलाद अशी मस्ती करणार नाही अशी भूमिका घेत आमदार रविंद्र घंगेकर यांनी येरवडा पोलीस स्टेशन येथे पोलिसानं विरुद्ध आंदोलन केले.

दरम्यान हे आंदोलन जाहीर होताच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पोलिस कमिशनर अमितेश कुमार देखील यांनी देखील या प्रकरणावर लक्ष देत, पुन्हा गुन्हा नोंदविण्याचा सूचना केलेल्या आहेत.

आमदार रविंद्र घंगेकर यांच्या मागण्या: 

या घटनेतील दोषी – 

१) पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल आग्रवाल ज्याने मुलाला ही आलीशान गाडी चालविण्यास दिली.या विशाल अग्रवालला तातडीने अटक झाली पाहिजे.

२)अल्पवयीन मुलांना दारू विकणाऱ्या मुंढव्यातील Cosie रेस्टॉरंट,  Marriott suits मधील Black पब,Ballr पब या सर्व पब मालकांवर देखील अटकेची कारवाई करत हे पब कायम स्वरुपी बंद केले पाहिजे.

३)येरवडा पोलीस स्टेशन मधील विकली गेलेली कायदा व सुव्यवस्था ज्यांनी अगदी किरकोळ कलमे लावून मुलाच्या जामिनासाठी रेड कार्पेट टाकून दिले.पैश्याच्या जिवावर दोघांना किड्या मुंगी प्रमाणे चिरडणाऱ्या या मुलाला पोलीस स्टेशन मध्ये बिर्याणी आणि पिझ्झा आणून खाऊ घातला.या पोलिसांवर कारवाई करत येथील अधिकारी कर्मचारी निलंबित केले गेले पाहिजे.

ही घटना एवढी भयानक होती की मागे बसलेली अश्विनी कोस्टा सुमारे 10 ते 15 फूट हवेत उडून खाली पडली. डोक्याला मार लागल्याने तिचा जागेवरच म्रुत्यु झालेला आहे. अनिस अवधिया देखील गंभीर जखमी होऊन तडफडत पडला होता, त्याची हालचाल बघून काही तरुणांनी त्याला उचलून एका रिक्षामध्ये टाकले आणि नगर रोडवरील सह्याद्री हाँस्पीटलमध्ये नेले, परंतु हाँस्पीटलमध्ये पोचण्यापूर्वीच त्याचाही म्रुत्यु झाला.

या प्रकरणी आपल्या प्रतिक्रीया आमच्या खालील व्हिडियो च्या कमेंट मध्ये लिहा…

 ज्या गाडीने 2 जीव घेतले त्या गाडीचा वेग बघा बाकी गोष्टी तुम्हीच ठरवा….
Drink and Drive:  बिल्डर मुलगा दारू पितानाचा पुरावा….

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours