पवन मावळ येथील धरणात हजारो माशांचा मृत्यू! कारण अज्ञात, स्थानिकांमध्ये चिंता आणि आरोग्यास धोका !

1 min read

अनिल घारे : मावळ प्रतिनिधी

पवनानगर : पवन मावळ परिसरातील मागील दोन-तीन दिवसांपूर्वी मळवंडी ठुले धरणाच्या काठावर मृत माशांचा खच पडला आहे या घटनेची सर्वत्र गावातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे परंतु हे मासे कशामुळे मेले हे अद्यापही कारण समजले नाही
हजारो मृत मासे धरणाच्या तीरावर पाहायला मिळाल्याने गावातील रहिवाशी चिंतेत पडले आहे त्यामुळे धरण प्रशासनी चौकशी करून याची दखल घ्यावी अशी मागणी आजूबाजूच्या गावातील स्थानिक ग्रामस्थांनी केली.

मावळ तालुका हे ऐतिहासिक स्थळांसह विविध निसर्ग सौंदर्याने नटलेला तालुका आहे हा निसर्गात ने वरदान लाभलेला तालुका आहे पवन मावळमध्ये पवना धरण व मळवंडी ठुले असा दोन धरणांचा समावेश होतो
तसेच तालुक्यात कासरसाई लोणावळा ठोकळवाडी वाडीवळे वलवन शिरोता आध्रा व भुशी अशी ही प्रमुख धरणे आहेत.

पवन मावळातील पवना धरणाच्या काही अंतरावर असलेले मळवंडी ठुले धरणातील हजारो माशे काठावर मृत पडण्याची घटना घडली त्याचे कारण अद्यापही अजून समजले नाही.

मागील दोन-तीन दिवसापासून दररोज धरणाच्या काठावर मासे मृत्युमुखी पडत असल्याने धरणाच्या आजूबाजूच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे धरणावर कपडे धुण्यासाठीजाणाऱ्या महिलांना प्रचंड त्रास होत असल्याने जनावरे पाणी पिण्यासाठी धरणावर जाणाऱ्या आरोग्य धोक्यात आले आहे घरात वापरण्यासाठी हेच पाणी असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यातही देखील परिणाम होण्याची शक्यता आहे तसेच मृत माशांचे कारण शोधून त्यावर तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ रहिवाशींनी केली

धरणाच्या परिसरातील सुरू असलेल्या चुकीच्या पद्धतीने मासेमारी आणि मत्स्यपालन हा देखील माशांच्या मृताचे कारण ठरू शकते मत्स्य पालन व्यवसाय करत असताना संबंधित व्यावसायिक हे माशांच्या खाण्यासाठी खराब खाद्यपदार्थ सुकट अन्य पदार्थ टाकल्याने माशांसहीत नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे त्यामुळे संबंधित व्यावसायिकांना योग्य त्या सूचना कराव्या अन्यथा माशांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणारे व्यवसाय बंद करावेत असा मागणीचा जोर धरू लागला आहे

गेल्या दोन-तीन दिवसापासून दररोज मासेमारी मृत्युमुखी पडत आहे याचा संदर्भ तहसीलदार ह्यांना संपर्क करण्यात आला आहे
मत्स्य पालनासाठी परवानगी देणाऱ्या हडपसर येथील कार्यालयात मळवंडी ठुले व कोथुर्णे वारू ग्रामपंचायतच्या वतीने मेलद्वारे पोस्टद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे याप्रकरणी संबंधीत प्रशासनाने माशांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या मत्स्यपालन व्यवसायिकांवर कारवाई करावी
:जयश्री राक्षे (सरपंच मळवंडी ठुले )

धरणाच्या काठावर मृत माशांचा खच पडला आहे माशांसाठी दररोज हजारो सडलेले खाद्यपदार्थ सुकट पाण्यात टाकले जातात स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे यावर प्रशासनाने चौकशी करावी : नामदेव ठुले, सरपंच, मळवंडी ठुले.

धरणाच्या लगत काठावरती मृत्युमुखी मासे पडलेले आहेत माशांना सडलेले पदार्थ खाद्य म्हणून टाकत आहे त्यामुळे माशांसह स्थानिक रहिवासींचे आरोग्य धोक्यात आहे यावरती प्रशासनाने योग्य तोडगा काढावा
:नामदेव निंबळे वारू,स्थानिक रहिवासी.

धरणाच्या तीरावर हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत मत्सो उत्पादन केंद्राची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहेपाण्याची चव बदलली आहे पाण्याला उग्र वासही येत आहे यावर प्रशासनाने दखल घ्यावी
:संतोष ठुले,चेअरमन ,कोथुर्णे वि का सोसायटी.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours