कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा जामीन बाल हक्क मंडळाने केला रद्द! बालसुधारगृहात रवानगी 

1 min read

दोन जणांचे जीव घेतल्यानंतरही केवळ निबंध लिहायला सांगून त्याला बाल हक्क मंडळाने जामीन दिलेला होता.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या मीडियाने या प्रकरणात आपली चोख भूमिका बजावल्याचे संपूर्ण प्रकरणास कलाटणी मिळाली.

या विरोधात संपूर्ण सगळीकडे संतापाचे वातावरण होते. या घटनेचे पडसाद उमटल्यानंतर आज बाल हक्क मंडळाने काल 22 मे रोजी अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करताना त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्याचे आदेश दिले.

शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास दुचाकीवरून निघालेल्या तरुण-तरुणीला अल्पवयीन मुलगा भरधाव वेगात चालवत असलेल्या पोर्श आलिशान कारने धडक दिली.यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. अगोदर दिलेल्या जामिनाचा पुनर्विचार करण्यात यावा, यासाठी पोलिसांनी बाल न्याय मंडळात अर्ज केला होता. त्यावर मंडळाच्या प्रमुख दंडाधिकारी एम. पी. परदेशी, सदस्य डॉ. एल. एन. धनवडे आणि के. टी. थोरात यांच्या मंडळासमोर बुधवारी दिवसभर सुनावणी झाली. 

त्यानंतर मंडळाने निकाल राखून ठेवला होता. रात्री आठच्या सुमारास निकाल देत मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. 

या सुनावणीमध्ये, कल्याणीनगरमधे झालेल्या अपघातानंतर आरोपीविषयी नागरिकांमध्ये रोष आहे. त्यातून त्याला इजा पोहोचेल अशा घटना घडू शकतात. त्यामुळे त्याने बाहेर राहणे धोकादायक ठरू शकते, असे म्हणणे पोलिसांनी सादर केले. 

जामीन झाल्यानंतर मुलाला बालसुधारगृहात पाठविण्यासाठी काही बदल गरजेचे आहेत. त्यामुळे आता त्याला बालसुधारगृहात पाठवणे कायदेशीर नाही, असा युक्तिवाद मुलाचे वकील प्रशांत पाटील यांनी केला. लेखी आदेश मिळाल्यानंतर याबाबत अपील करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, मुलाला प्रौढ म्हणून खटला चालविण्यासाठी पोलिसांचा अर्ज मंडळाने दाखल करून घेतला असून, त्यावर निर्णय झालेला नाही, असे मुलाचे वकील अ‍ॅड. प्रशांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

विधिसंघर्षित बालकावर तीस दिवसांत आरोपपत्र दाखल करणे गरजेचे आहे.त्यानंतर या बालकाच्या सामाजिक, मानसिक स्थितीबाबत अहवाल लक्षात घेतले जातात. या काळात त्याला बालसुधारगृहात ठेवण्याची आवश्यकता नसते. साठ ते नव्वद दिवसांच्या प्रक्रियेनंतर मुलाला प्रौढ ठरविण्याचा निर्णय घेतला जातो, असे अ‍ॅड. प्रशांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

केस कापून, टापटीप होऊन आला कोर्टात

बुधवारी सकाळी येरवड्यातील बाल न्याय मंडळामध्ये कार चालवणारा अल्पवयीन मुलगा हजर झाला. त्याच्यासोबत त्याची आई, आजोबा आणि नातेवाईक होते. तसेच वकिलांची टीमदेखील होती. धीरगंभीर अवस्थेत मुलगा दिसत होता. CCTV मध्ये केस वाढविलेले दिसत असलेला मुलगा आज टापटीप, केस कापून बाल न्यायालय मंडळात हजर झाला. 

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours