मावळ: जांभुळ येथील महिंद्रा CIE कंपनीसमोर शुक्रवारी सकाळी एका तरुणीवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली आहे. आरोपी आणि पीडित तरुणी हे एकच कंपनीत काम करत असल्याची असल्याची माहिती मिळाली आहे.
जखमी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी हा काही दिवसांपासून तिचा मोबाईल नंबर मागत होता, तरुणीने त्याला नकार दिल्याचा राग मनामध्ये धरून आरोपी संतोष मारूती लगली, वय 43 वर्षे याने चाकूने हल्ला केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. लक्ष्मी माताप्रसाद वाल्मिकी (25) नावाची तरुणी सकाळी 8 वाजता कंपनीत कामावर जात होती. यावेळी कंपनीच्या गेटसमोरच संतोष मारूती लगली (43) नावाच्या आरोपीने तिच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात लक्ष्मी गंभीर जखमी झाली.
हल्ल्याची माहिती मिळताच तात्काळ स्थानिकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि आरोपीचा शोध सुरू केला. आणि अवघ्या काही तासांच्या आतच पोलिसांनी आरोपी, संतोष मारूती लगली याला बेड्या ठोकल्या, आरोपी लगलीवर हत्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुन्ह्याचे स्वरूप:
गुन्हा क्रमांक: 282/2824 भा.द.वि. क. 307,506
फिर्यादी: सौ. लक्ष्मी माताप्रसाद वाल्मिकी, वय 25 वर्षे
आरोपी: संतोष मारूती लगली, वय 43 वर्षे
घटनास्थळ: महिंद्रा CIE कंपनी, जांभुळ, ता. मावळ, जि. पुणे
घटना तारीख आणि वेळ: शुक्रवार, 17 जून 2024, सकाळी 8.00 वा.
+ There are no comments
Add yours