वडगाव मावळ: बुधवारी वडगाव कुडेवाडा येथे पुणे मुंबई महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर शालेय विद्यार्थी हे जखमी झाले आहेत अपघाताला जबाबदार असणाऱ्या एम एस आरडीसी आणि आयआरबी विभागाच्या अधिकाऱ्यांचा निषेध नोंदवण्यात आला.
गुरुवार सकाळी 10 वाजता वडगाव शहर सर्वपक्षीय व ग्रामस्थांच्या वतीने पुणे मुंबई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले त्याच दरम्यान रस्ते विकास महामंडळ व आय आर बी चे तात्काळ उपयोजना करावी ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी अपघातातील मृत व जखमींना त्वरित मदत करावी अशी मागणी करण्यात आली.
मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख तसेच पोलीस निरीक्षक कुमार कदम आय आर बी चे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्या नंतर त्यानंतर आंदोलन मागे करण्यात आले आश्वासन असे देण्यात आले की दरम्यान आठ दिवसात ठोस कारवाई न कर झाल्यास तीव्र mआंदोलनाचा इशाराही आंदोलकांच्या वतीने देण्यात आला.
या वेळी पुणे मुंबई महामार्गावर अर्धा ते एक तास आंदोलन करण्यात आले यावेळी काही काळ वाहनांची कोंडी झाली होती.अपघात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे तसेच जखमी शालेय झालेल्या मुलांच्या कुटुंबासह या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी आंदोलनानंतर तहसील कार्यालयाच्या दालनामध्ये माजी उपसभापती गणेश आप्पा ढोरे, भास्करराव म्हाळसकर, गुलाबराव म्हाळसकर, सुनील ढोरे, पंढरीनाथ ढोरे, अनंता कुडे, प्रविण चव्हाण, मयुर ढोरे विशाल, वहिले दत्ता पडवळ, प्रवीण ढोरे, किरण म्हाळसकर तहसीलदार विक्रम देशमुख , वडगाव नगर मुख्य अधिकारी डॉ प्रवीण निकम रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता एम डी काजरेकर सुरक्षा अधिकारी पोपट शिंदे आय आरबी चे अभियंता अभय पावसकर पोलीस निरीक्षक कुमार कदम सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थ बैठक घेण्यात आली.
यावेळी आय आर बी कंपनीचे वारंवार पाठपुरवठा करून शहरात अपघाताचे ब्लॅक स्पॉट असलेल्या ठिकाणी कोणत्याही सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने नागरिकांचा व ग्रामस्थांचा संताप व्यक्त केला भविष्यात अशी कोणतीही गोष्ट घडू नये यावेळी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
बैठकीत मृत महिलेच्या वारसांना व जखमीना मदत मिळवून देण्याचे आश्वासन तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिले महामार्गावर सुरक्षा विषयी उपाययोजना तातडीने करण्याची सूचना त्यांनी संबंधित कार्यालयांना केली रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांनी उपायोजनांचे काम त्वरित सुरू करण्याचे आश्वासनही देण्यात आले.
बैठकीत झालेल्या मागण्या
१) अपघातातील मृत महिलेच्या वारसांना नुकसान भरपाई मिळावी व मुलाला नोकरी द्यावी
२) अपघातात जखमींना उपचारासाठी मदत मिळावी
३) पी एम पी एल ची बस सेवा रस्त्याने सुरू व्हावी रस्त्याची दुभाजकाची रुंदी वाढवावी
४) सेवा रस्त्यात वाहने पार करून देऊ नयेत
५) मातोश्री हॉस्पिटल कुडेवाडा हॉटेल शिवराज न्यू इंग्लिश स्कूल माळीनगर या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवावेत
६) रस्त्यालगत दोन्ही बाजूंना ऐलो दिव्यांचे ब्लिकर बसवावेत
७)न्यू इंग्लिश स्कूल समोर संपूर्ण वेळ वाहतूक पोलीस नेमावा
८) मुख्य बैठकीत महत्त्वाच्या छेद मार्गाच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यासाठी पाठपुरावा
बुधवारी झालेल्या अपघातानंतर तात्काळ गतिरोधक बसवण्यात येणार अपघातात मृत्यू व जखमींना शासन निर्णय योजनेत अंतर्गत मदत करणार: तहसीलदार मावळ, विक्रम देशमुख
मृत झालेल्या वारसांना तसेच आपघातात जखमी झालेल्या वरिष्ठांची चर्चा करून मदत देणार आहे मृत झालेल्या महिला यांच्या मुलाला आय आर बी मध्ये नोकरीची मागणीबाबत संबंधित अधिकाऱ्याची चर्चा करून निर्णय घेऊ : अभय पावसकर, सीनियर इंजिनीयर
पुणे मुंबई महामार्गावर उड्डाणपुलाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार आहे तसेच महामार्गावरील संधार रस्त्याच्या
बाजूला असलेले अतिक्रमण त्वरित कारवाई करण्यात येईल मातोश्री हॉस्पिटल कुडे वाडा चौक येथे वाहनाचा रोजचा नियंत्रीत करण्यासाठी तात्काळ गतिरोधक बसवण्याचे काम सुरू : एम. व्ही. काजरेकर, डेप्युटी इंजिनियर, रस्ते विकास महामंडळ
+ There are no comments
Add yours