वडगांव मावळ: मावळ तालुक्यातील महसूल विभागातील कोतवाल संघटनेने 27 जून 2024 रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांना लेखी निवेदन दिले आहे.
या निवेदनानुसार, महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने मुंबई मंत्रालय येथे दिलेल्या निवेदनास तालुका कोतवाल संघटना मावळ यांचा पूर्ण पाठिंबा आहे. कोतवालांच्या मागण्या 3 जुलै 2024 पर्यंत मंजूर न झाल्यास राज्यभरात कोतवाल संघटनेतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे आणि तालुका कोतवाल संघटना मावळ यांचा पूर्ण संख्येने सहभाग असेल.
मावळ तालुका तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या दालनात निवेदन देताना कोतवाल संघटनेने मागणी केली की 4 आणि 5 जुलैपासून सुरू होणाऱ्या बेमुदत काम बंद आंदोलनासाठी मुख्यालय आणि तलाठी सजा सोडवण्याची परवानगी मिळावी. तसेच, 24 तास शासनाची आणि जनतेची सेवा करणाऱ्या कोतवालांना आंदोलनाची वेळ येऊ न देता त्यांची मागणी सहानुभूतीपूर्वक विचारात घेण्यात यावी.
कोतवालांच्या मागण्या:
- राज्यातील सर्व कोतवालांना चतुर्थ श्रेणी लागू करणे.
- तलाठी आणि लिपिक पदामध्ये 25% कोटा राखीव ठेवणे.
- सेवानिवृत्त कोतवालांना पेन्शन आणि अनुकंप लागू करणे.
- कोतवाल पदाचे नाव बदलून तलाठी सहाय्यक किंवा महसूल सेवक करणे.
- सेवानिवृत्त कोतवालांना 300 दिवसांची रजा रोखीकरण मिळणे.
- कोतवाल मधून शिपाई पदावर देण्यात यावा 40% कोटा वाढून 80% करणे.
- 8 फेब्रुवारी 2019 शासन निर्णयानुसार अटल पेन्शन बाबत सुधारित जीआर काढणे.
आंदोलनाची टप्पे:
- 1 जुलै 2024: तहसीलदारांना आंदोलनाबाबत नोटीस देणे.
- 4 आणि 5 जुलै 2024: आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन.
- 10 जुलै 2024: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन.
- 22 जुलै 2024: लोणी, ता. राहता, जिल्हा अहमदनगर येथे बेमुदत अमरण उपोषण.
कोतवाल संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ कालेकर, अध्यक्ष विठ्ठल पाठारे, उपाध्यक्ष चंद्रकांत तळपे, खजिनदार श्रीपती गायकवाड, गणेश लांघे, संभाजी कुटे, गणेश टिळेकर, भाऊ हेमाडे, संजय कांबळे, सागर जाधव, सागर शिंदे आणि अश्विनी सुतार यांनी निवेदन दिले आहे.
+ There are no comments
Add yours