भारतीय सैन्य दलाच्या अतुलनीय शौर्याला 25 वर्षे पूर्ण झाल्याने कारगिल विजय दिनाचा “रौप्य महोत्सवी सोहळा” शुक्रवार, दि. 26 जुलै 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता “साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमी लोहगाव, पुणे” येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात तिरंगा ध्वजरोहन करून कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर शहीद सैनिकांना मानवंदना देण्यात आली. अमर जवान स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून स्मरण करण्यात आले. याप्रसंगी कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या विर-पत्नी, कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या सैनिकांचा व माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास माजी सैनिक सेलचे राज्य प्रमुख तथा प्रदेशाध्यक्ष दिपक राजे शिर्के, कारगिल युद्ध वीर मेडल प्राप्त सुभेदार राजेंद्र साळुंखे, कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकाच्या वीर पत्नी श्रीमती अंबिका राठोड, 1971 चे युद्धविर कॅप्टन बाबुराव पोळके, एअरफोर्स विंग कमांडर एम. तिरुमारन, विशेष सेवा मेडल सुभेदार चंद्रकांत गायकवाड, सुभेदार सुधीर शिंदे, कॅप्टन रावसाहेब हराळ, सुभेदार श्रीमंत राठोड, सुभेदार अजित काटे, कॅप्टन अशोक वाघमारे, हवलदार राजेश साबळे, नायब सुभेदार अशोक अवारे, सैन्य प्रशिक्षक स्वप्नील जोगदंड आदी. मान्यवर उपस्थीत होते.
+ There are no comments
Add yours