राज्यातील भगिनींनी बांधलेली राखी हेच माझे सुरक्षा कवच – उपमुख्यमंत्री अजित पवार

1 min read

तळेगाव दाभाडे: “महाराष्ट्रातील भगिनींनी बांधलेली राखी हेच माझे सुरक्षा कवच आहे. त्यामुळे मला कोणीही वाकडे करू शकत नाही. मी महाराष्ट्रभर निश्चिंतपणे फिरत राहणार आहे,” असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. तळेगाव दाभाडे येथे आयोजित एका भव्य रक्षाबंधन कार्यक्रमात पवार यांनी आपले विचार मांडले.

मावळातील महिलांच्या उदंड प्रेमाने भारावून गेलेल्या पवारांनी, “मावळच्या जनतेच्या प्रेमाचा मी मरेपर्यंत विसर करणार नाही. त्यांच्या साथीने मावळाचा आणि राज्याचा कायापालट करण्याचे वचन मी देतो,” असेही स्पष्ट केले.

कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, मावळचे आमदार सुनील शेळके, आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

ओवाळणी परत घेण्याचा प्रश्नच नाही – अजित पवार

कार्यक्रमा दरम्यान अजित पवार यांनी “माझी लाडकी बहीण” योजनेच्या विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. “राज्याच्या अंदाजपत्रकात योजनेसाठी पुरेशी तरतूद केली आहे. एकदा दिलेली ओवाळणी परत घेण्याचा प्रश्नच नाही. विरोधकांच्या भूलथापांना कोणीही बळी पडू नये,” असे पवार यांनी स्पष्ट केले.

भगिनींच्या प्रेमाने भावूक झाले आमदार सुनील शेळके

सभेतील महिलांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने आमदार सुनील शेळके भावूक झाले. आपल्या भाषणादरम्यान भावना अनावर झाल्यामुळे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना सावरण्यास मदत केली. “मावळच्या जनतेने माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थ करून दाखवला आहे. आता तालुक्यातील अपूर्ण योजनांची पूर्णता करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी सहा महिन्यात आदेश द्यावेत,” अशी मागणी शेळके यांनी केली.

मावळ तालुक्यातील विकासासाठी २६०० कोटींचा निधी

“मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा आमदार निवडून दिल्याने सुमारे २६०० कोटींचा निधी मावळात उपलब्ध झाला आहे,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली. “महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या समारोपाला मावळ तालुक्यातील भगिनींनी राखी बांधून उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.

  • Ajit Pawar on Ladaki Baheen Yojna
  • Maval women’s gathering
  • Ajit Pawar security statement
  • Sunil Shelke emotional speech
  • NCP Maval event
  • Ajit Pawar Maharashtra tour
  • Maval development projects
  • Raksha Bandhan festival Maharashtra

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours