सत्ताधाऱ्यांची ‘लाडकी बहीण’ योजना फसवी: महाराष्ट्रातील महिलांची सुरक्षा धोक्यात.

0 min read

महिलांच्या सुरक्षेसाठी मावळ महाविकास आघाडीची आक्रोश मोर्चा..

मावळ: बदलापूरमध्ये घडलेल्या लहान मुलीवरील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी मावळ तालुक्यात महाविकास आघाडीने तीव्र आंदोलन केले. “नराधमांना फाशी द्या, चिमुकल्यांना न्याय द्या,” अशा जोरदार घोषणांनी आंदोलन जागृत झाले.

महाराष्ट्रातील महिलांवरील वाढत्या अत्याचारांवर सरकारची अपयशाची टीका करत, आंदोलनकर्त्यांनी या घटनेच्या विरोधात आवाज उठवला.

मावळचे तहसिलदार मा. विक्रम देशमुख यांना निवेदन देऊन, या प्रकरणात फास्ट ट्रॅक न्यायालयाची मागणी करण्यात आली. आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांनी गृहमंत्रालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, राज्य सरकारवर कडक टीका केली.

या वेळी आंदोलकांनी आपला आक्रोश या घोषणा देऊन केला:

  • “न्याय द्या, न्याय द्या, लाडक्या बहिणीला न्याय द्या!”
  • “सुरक्षा द्या, सुरक्षा द्या, बहिणीच्या लेकीला सुरक्षा द्या!”
  • “नराधमांना फाशी झालीच पाहिजे!”

आंदोलनात मावळ तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या उपस्थितीत बदलापूर अत्याचार प्रकरणाचा कठोर निषेध व्यक्त करण्यात आला.

“राज्यातील महिलांची सुरक्षा धोक्यात: विकृती रोखण्यासाठी राज्य सरकारला आव्हान”

संपूर्ण राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी आता कठोर पावले उचलण्याची गरज आहे. हे आंदोलन महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या रोषाचे प्रतीक बनले असून, न्यायासाठी लढा देण्याचा दृढ संकल्प या आंदोलनाच्या माध्यमातून दिसून आला.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours