पोलीसांच्या तात्काळ कारवाईत 985 ग्रॅम गांजा, मोबाईल, आणि स्कूटरसह आरोपी गजाआड
Ganja Worth ₹1.1 Lakh Seized in Wadgaon Maval, One Accused Arrested
वडगाव मावळ : वडगाव मावळ येथील उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रामा केअर युनिटसमोरील रस्त्यावर पोलिसांनी केलेल्या धाडीत सुमारे 20,000 रुपयांचा 985 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एक काळ्या रंगाचा मोबाईल फोन आणि होंडा ॲक्टीव्हा स्कूटर देखील ताब्यात घेतली आहे. आरोपी सतीश ऊर्फ संतोष ऊर्फ माया सुरेश डोळस (वय 26, रा. जांभुळ, मावळ) यास अटक करण्यात आली आहे.
दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11:40 च्या सुमारास पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानुसार ही कारवाई करण्यात आली. आरोपी सतीश डोळस आपल्या होंडा ॲक्टीव्हा स्कूटर (क्र. MH 14 LF 8933) च्या डिक्कीमध्ये गांजा वाहतूक करताना सापडला. पोलिसांनी 985 ग्रॅम वजनाचा गांजा, एका अॅपल कंपनीचा मोबाईल फोन आणि होंडा ॲक्टीव्हा स्कूटर एकूण 1,10,000 रुपये किमतीचा माल जप्त केला आहे.
ही कारवाई संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक संतोष जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जावळे, पोलीस उपनिरीक्षक सचिन काळे आणि त्यांच्या टीमने कारवाईत सहभाग घेतला.
सदर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्यावर अंमली पदार्थ कायदा 1985 अंतर्गत कलम 8 (क), 20 (ब) II (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई एस.ए. जावळे करीत आहेत.
वडगाव मावळ येथे पोलिसांनी 985 ग्रॅम गांजा, मोबाईल आणि होंडा ॲक्टीव्हा स्कूटरसह एकूण 1.1 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. आरोपी सतीश ऊर्फ संतोष डोळस यास अटक करण्यात आली असून, तो गांजा विक्रीसाठी वाहतूक करताना सापडला. ही कारवाई संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ कायदा 1985 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
Wadgaon Maval police seized 985 grams of ganja worth ₹1.1 lakh, along with a mobile phone and a Honda Activa scooter, during a raid near the sub-district hospital and trauma care unit. The accused, Satish alias Santosh alias Maya Suresh Dolas (26), was arrested for transporting ganja in his scooter. The operation, conducted on September 28, 2024, was part of an anti-drug campaign under the guidance of senior police officials. A case has been registered against the accused under the NDPS Act, and further investigation is ongoing.
Pune drug bust, ganja seized in Maval, 985 grams marijuana seized, drug trafficking in Maharashtra, Maval police raid, NDPS Act 1985 arrest, illegal substance trafficking, Wadgaon Maval crime news, Pune drug dealer arrested, police anti-drug campaign.
+ There are no comments
Add yours