Pune Municipal Corporation’s New Rule Complaints to be Closed Only After Resident Feedback.
महत्वाचे आणि विश्वसनीय अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा =>https://ln.run/MCeiB
पुणे: पुणे महानगरपालिकेने (PMC) तक्रारींच्या प्रक्रियेत मोठा बदल करत नागरिकांच्या अभिप्रायाशिवाय तक्रारी बंद न करण्याचा नवा नियम लागू केला आहे. यामुळे तक्रारींवर काम न करता फक्त कागदोपत्री त्यांना सोडवण्यात आल्याचा आभास निर्माण करण्याचे प्रकार थांबवले जातील.
PMC ने काही वर्षांपूर्वी ‘PMC Care’ नावाचे अॅप सुरू केले होते, ज्यामधून पुणेकर नागरिक शहरातील विविध समस्या आणि तक्रारी नोंदवू शकतात. यामध्ये पाण्याच्या कमी पुरवठ्यापासून, रस्त्यांवरील खड्डे, गटारे तुंबणे, फुटलेल्या पाईपलाइन, वीजेचे धोकादायक खांब अशा अनेक समस्या नोंदवल्या जाऊ शकतात.
तक्रार केल्यानंतर नागरिकांना टोकन क्रमांक मिळतो आणि एका-दोन दिवसांत तक्रार सोडवली गेल्याचा संदेशही मिळतो. मात्र, अनेक पुणेकरांनी तक्रार केली असली तरी प्रत्यक्षात काम होत नसल्याची तक्रार व्यक्त केली आहे.
महानगरपालिकेने याप्रकरणी विविध आश्वासने दिली आहेत, पण कामाच्या गुणवत्तेमध्ये फारसा बदल झाल्याचे नागरिकांना जाणवले नाही. त्यामुळे संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना तक्रारदारांचा अभिप्राय घेतल्याशिवाय तक्रारी बंद करू नयेत असे निर्देश दिले आहेत. ही माहिती पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी माध्यमांना दिली.
गटारे तुंबणे, खड्डे दुरुस्त करणे, वीजेचे खांब दुरुस्त करणे यांसारख्या तातडीच्या समस्या जलदगतीने सोडवल्या जातात. परंतु, पाणी आणि मलनिस्सारणाच्या पाईपलाईन बदलणे तसेच रस्त्यांचे डांबरीकरण यांसारखी कामे थोडा अधिक वेळ घेतात. त्यामुळे यापुढे अशा तक्रारदारांना फोनवरून संपर्क करून कामाची अपेक्षित वेळ सांगितली जाईल आणि त्यानंतरच तक्रार बंद करण्यात येईल.
The Pune Municipal Corporation (PMC) has introduced a new rule where complaints will only be closed after receiving feedback from residents. This initiative aims to prevent cases where complaints are falsely marked as resolved without proper action. The PMC Care app allows residents to report issues such as road damage, water supply problems, and more. While minor issues are quickly addressed, larger projects like replacing water pipelines take longer, and citizens will now be informed about the timeline for such work before their complaints are closed.

Pune Municipal Corporation complaints PMC Care app complaint system Pune resident feedback system PMC citizen complaint resolution Municipal complaints Pune Resident feedback in PMC Water supply complaints Pune Pune road repairs complaints
+ There are no comments
Add yours